Download App

लाखो भारतीयांचे जीव वाचणार; लष्कराला मिळाले अपघात नियंत्रण प्रणालीचे पेटंट

  • Written By: Last Updated:

Indian Army Patent News : भारतीय लष्कराने (Indian Army) आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (Artificial Intelligence) माध्यातून एक महत्त्वाचे उपकरण विकसित केले आहे, जे लाखो लोकांचे प्राण वाचवेल. या उपकरणाचे भारतील लष्कराला पेटंटही (patent) मिळाले आहे. रस्ते अपघात ही केवळ भारतातच नव्हे तर जगभरात डोकेदुखी बनली. कितीही कडक नियम केले, काहीही केले तरी अपघात थांबवता येत नाहीत. यामुळे हे लष्करी उपकरण मोठा दिलासा देणार आहे. भारतीय लष्कराने शुक्रवारी सांगितले की त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चालित अपघात प्रतिबंधक प्रणालीचे पेटंट मिळाले आहे. (indian army receives patent for ai driven accident prevention system)

लष्कराच्या संशोधन आणि विकास (R&D) घटकाने ही अपघात प्रतिबंधक यंत्रणा स्वदेशी विकसित केली आहे, असे भारतीय लष्कराने ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमध्ये पुढं लिहिलं की, “भारतीय लष्कराला संस्थेच्या अंतर्गत संशोधन आणि विकासाद्वारे स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अपघात प्रतिबंधक प्रणाली’ या प्रकल्पाचे पेटंट मिळाले आहे. अपघात प्रतिबंधक प्रणाली ड्रायव्हिंग करताना झोपलेल्या चालकांना सावध करून आणि अपघातामुळे होणारी असुरक्षा कमी करून जीव वाचवेल.”

बापरे बाप, आमदाराच्या घरात कोब्रा साप! दोन डझन साप आढळल्याने उडाली खळबळ 

कुलदीप यादव असे शोधकाचे नाव आहे. पेटंट प्रमाणपत्रात असे म्हटले आहे की ते पेटंटसाठी 2 फेब्रुवारी 2021 रोजी दाखल केले होते.

आता त्याला पेटंट मिळाले. 11 जुलै रोजी पेटंट मंजूर करण्यात आले. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये, लष्कराने नवीन कॅमफ्लाज पॅटर्न युनिफॉर्मसाठी पेटंट मिळवले होते.

बहुतांश अपघात हे चालकाला डुलकी लागल्याने होतात. आता AI आधारित डिव्हाइस ड्रायव्हरवर लक्ष ठेवणार आहे. चालकाला डुलकी लागली रे लागली की ते अलार्म वाजवून चालकाला जागं करणार आहे. यामुळं अपघातावर नियंत्रण मिळवण्यास फायदा होणार असल्याचा दावा लष्कराने केला.

 

Tags

follow us