Research Vessel : समुद्रात संशोधन जहाज भरकटलं! कोस्टगार्डने बाजी लावत केली सुटका…

Research Vessel : भारत सरकारचं भरकटलेलं संशोधन जहाजाची सुटका करण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आलं आहे. दरम्यान, 8 वैज्ञानिकांसह 28 सदस्य जहाजात प्रवास असतानाच जहाजात तांत्रिक अडचण झाली. त्यानंतर हे जहाज समुद्रातच भरकटत होते. तटरक्षक दलाला माहिती समजताच कोस्टगार्डने जीवाची बाजी लावत या जहाजाची सुटका केली आहे. Indian coast guard rescue research vessel RV Sindhu […]

Jahaj

Sindhu sadhna Research Vessel

Research Vessel : भारत सरकारचं भरकटलेलं संशोधन जहाजाची सुटका करण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आलं आहे. दरम्यान, 8 वैज्ञानिकांसह 28 सदस्य जहाजात प्रवास असतानाच जहाजात तांत्रिक अडचण झाली. त्यानंतर हे जहाज समुद्रातच भरकटत होते. तटरक्षक दलाला माहिती समजताच कोस्टगार्डने जीवाची बाजी लावत या जहाजाची सुटका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत सरकारचे ‘सिंधू साधना’ हे संशोधन जहाज समुद्रात प्रवास करीत होते. या जहाजामध्ये 8 वैज्ञानिकांसह 28 सदस्य असे एकूण 36 लोकं होते. गोव्याच्या दिशेने प्रवास करीत असताना जहाजामध्ये अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यानंतर हे जहाज समुद्रात भरकटलं.

व्वा रं पठ्ठ्या! IIT, IIM मध्ये न शिकता सव्वा कोटींचं पॅकेज, नाशिकच्या अनुरागची उंच भरारी…

जहाजामध्ये तांत्रिक अडचणी आल्याचे लक्षात येताच जहाजातील सदस्यांनी भारतीय तटरक्षक दलाला संपर्क साधून माहिती दिली. भारतीय तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनूसार, ‘सिंधू साधना’ संशोधन जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाली, त्यावेळी हे जहाज 3 नॉट्स वेगाने वाहत होते.

आम्हाला माहिती समजली तेव्हा जहाज जमिनीपासून सुमारे 20 समुद्री मैलांवर होते. त्यानंतर तत्काळ तटरक्षक दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरु केलं. या जहाजाच्या सुटकेसाठी निघालेलं जहाज सायंकाळी ५ वाजता आणि दुसरे जहाज रात्री पोहोचले, अशी माहिती तटरक्षक दलाने निवेदनाद्वारे दिली आहे.

दरम्यान, हे संशोधन जहाज भारतासाठी महत्वाचं होतं. हे संशोधन जहाज असल्याने देशाच्या दृष्टीने ही एक अतिशय महत्त्वाची राष्ट्रीय संपत्ती असल्याचं एल अरुण यांनी सांगितलं आहे.

Exit mobile version