INS Kirpan: चीनचा करेक्ट कार्यक्रम, भारतीय नौदलाची ‘INS कृपन’ व्हिएतनामला भेट

INS Kirpan : गेल्या दशकापासून भारत-चीन संबंध ताणले गेले आहेत. भारताला कोंडीत पकडण्याची एकही संधी चीन सोडत नाही. त्यामुळे भारताने देखील जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. चीनचा दुश्मन आणि भारताचा मित्र असलेल्या व्हिएतनामला मोठं गिफ्ट दिले आहे. भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार दक्षिण चीन समुद्रातील लष्करी तळावर व्हिएतनामी नौदलाला स्वदेशी युद्धनौका ‘कृपन’ […]

Vietnam

Vietnam

INS Kirpan : गेल्या दशकापासून भारत-चीन संबंध ताणले गेले आहेत. भारताला कोंडीत पकडण्याची एकही संधी चीन सोडत नाही. त्यामुळे भारताने देखील जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. चीनचा दुश्मन आणि भारताचा मित्र असलेल्या व्हिएतनामला मोठं गिफ्ट दिले आहे. भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार दक्षिण चीन समुद्रातील लष्करी तळावर व्हिएतनामी नौदलाला स्वदेशी युद्धनौका ‘कृपन’ भेट देणार आहेत. या भेटीमुळे भारत चीनला आपल्याच घरात घेरू शकेल, असे मानले जात आहे.

इतर शेजाऱ्यांप्रमाणेच चीनचा व्हिएतनामशीही सिमा वाद आहे. व्हिएतनामच्या उत्तरेला चीन आणि पूर्वेला दक्षिण चीन समुद्र आहे. भारत आणि व्हिएतनाममधील संबंध सौहार्दपूर्ण आहेत कारण 1979 च्या चीन-व्हिएतनाम युद्धात भारताने व्हिएतनामला मदत केली होती. यामुळे चीनला मोठी मनहानी सहन करावी लागली होती. भारताची रणनीती चीनसारखी कधीच विस्तारवादाची नव्हती, परंतु व्हिएतनामला भेट दिलेली आयएनएस ‘कृपन’ विस्तारवादी ड्रॅगनला घेरण्यात उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे.

गेमिंग अॅप्सच्या माध्यमातून व्यावसायिकाला 58 कोटींचा गंडा; आरोपीच्या घरात सापडलं मोठं घबाड

आयएनएस ‘कृपन’ 8 जुलै रोजी व्हिएतनामला पोहोचली
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र-सुसज्ज कॉर्व्हेट (लहान युद्धनौका) INS ‘कृपन’ 8 जुलै रोजी कॅम रान्ह आंतरराष्ट्रीय बंदरावर पोहचली आणि व्हिएतनामी पीपल्स नेव्हीने तिचे स्वागत केले. भारत ते व्हिएतनाम या शेवटच्या प्रवासात या युद्धनौकेत तिरंगा अभिमानाने फडकत होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, युद्धनौका व्हिएतनामच्या नौदल तळावर पोहोचली आहे. तेथे प्रथम भारतीय नौदलातून निवृत्त होईल. यानंतर नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार हे व्हिएतनामी नौदलाकडे सोपवतील.

चीनमध्ये सेलिब्रिटी-राजकारणी का होतात बेपत्ता? ‘जॅक मा’नंतर परराष्ट्र मंत्रीही गायब

अनेक मोहिमांमध्ये युद्धनौकेचा सहभाग
INS ‘कृपन’ हे तिसरे स्वदेशी बनावटीचे खुकरी वर्गाचे क्षेपणास्त्र कॉर्वेट आहे. हे अनेक शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज आहे. हे आतापर्यंत अनेक ऑपरेशन आणि मदत कार्यांमध्ये सहभागी केले गेले आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, अॅडमिरल आर हरी कुमार हे हाई फोंग येथील व्हिएतनाम पीपल्स नेव्ही मुख्यालयालाही भेट देतील आणि व्हिएतनाम पीपल्स नेव्हीच्या व्हाइस अॅडमिरल ट्रॅन थान एनघिम, सीआयएनसी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. ते व्हिएतनामच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत.

Exit mobile version