गेमिंग अॅप्सच्या माध्यमातून व्यावसायिकाला 58 कोटींचा गंडा; आरोपीच्या घरात सापडलं मोठं घबाड

गेमिंग अॅप्सच्या माध्यमातून व्यावसायिकाला 58 कोटींचा गंडा; आरोपीच्या घरात सापडलं मोठं घबाड

Online Gaming Apps Fraud : ऑनलाइन गेमिंग अॅप्सद्वारे (Online Gaming Apps) फसवणूक झाल्याची प्रकरणे आपण अनेकदा पाहिली आहेत. मात्र, ऑनलाइन गेमिंग अॅप तयार करून व्यावसायिकांची 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) सुमारे 10 कोटींचा रक्कम जप्त केली आहे. या घटनेमुळं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (in nagpur 58 crore fraud of businessman through online gaming)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तयार केलेल्या ऑनलाइन गेमिंग अॅपमध्ये तीनपट्टी, कॅसिनो अशा अनेक गेमचा समावेश होता. या अॅपवर खेळणाऱ्या व्यावसायिकाला गेमिंग अॅपमधून कोट्यवधी रुपयांची कमाई होतं असं सांगण्यात आलं. आपण गेम जिंकू जिंकू असं म्हणत व्यावसायिकाने त्यात करोडो रुपये गुंतवले. मात्र, व्यापाऱ्याने खेळायला सुरूवात केल्यावर तो पैसे हरत गेला. हा गेम खेळताना कोणी जिंकले तर अचानक अॅपमध्ये एरर येते. पण नेहमीच अशाच प्रकारचा येत होता. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे व्यापाऱ्याच्या लक्षात आले आणि व्यावसायीकाने थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य समजून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.

मानसी नाईकचा हटके अंदाज, PHOTO सोशल मीडियावर तुफान व्हायरल 

आरोपीच्या घरावर छापा टाकला असता त्याच्या घरात मोठं घबाड आढळून आलं. त्यात रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिनेही सापडले. अनंत उर्फ ​​सोमटू जैन (गोंदिया) असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार आहे. या आरोपीचे फिर्यादीसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. आरोपी हा फिर्यादीचा बिजनेस पार्टनर होता. आरोपींने फिर्यादीची गेल्या दोन वर्षात ऑनलाईन गेमद्वारे टप्प्याटप्प्याने 58 कोटी रुपयांची फसवणूक केली. नागपूर पोलिसांकडे हे प्रकरण समोर येताच तपास सुरू केला.

आरोपी गोंदियाचा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून मोठी रक्कम जप्त केली. पोलिसांनी आरोपीच्या घरातून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या पैशांचे मोजमाप सुरू असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 10 कोटी रुपये मोजले गेले आहेत. घरात चार किलो सोने सापडल्याची बाबही समोर आली आहे.

हे मोठं रॅकेट असू शकतं. याचा सखोल तपास पोलिस यंत्रणा करेल, असं सांगत या अॅपच सर्वह देशाबाहेर असल्याची भीतीही पोलिसांनी व्यक्त केली. दरम्यान, ऑनलाईन-डिजीटल पैसे देतांना, डिजीटल व्यवहार करतांना खबरदारी घ्यावी, असं आवाहनही पोलिसांनी केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube