Download App

नौदलाची मोहिम फत्ते; MV Lila नॉरफॉक जहाजात अडकलेल्या 15 भारतीयांची सुटका

Indian Navy : भारतीय नौदलाने (Indian Navy) 15 भारतीयांची समुद्री लुटारुंच्या तावडीतून सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. बऱ्याच कालावधीनंतर अखेर ही मोहिम भारतीय नौदलाकडून यशस्वी करण्यात आली आहे. नौदलाकडून समुद्री लुटारुंविरोधात कडक कारवाई करण्याबाबतचे निर्देश जार करण्यात आलं असून हायजॅक केलेल्या जहाजात एकूण 21 जण होते.

भारतीय नौदलाच्या अथक परिश्रमानंतर ही मोहिम यशस्वी झाली असून हायजॅक केलेल्या जहाजातून 15 भारतीयांची सुटका भारतीय नौदलाकडून करण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थांकडून देण्यात आली आहे. अरबी समुद्रात व्यापारी जहाजांवरील हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदलाला तैनात करण्यात आलं आहे.

‘तेव्हा कोल्हे भेकडासारखे पळून गेले होते…’, अजित पवार गटाची अमोल कोल्हेंवर घणाघाती टीका

समुद्री लुटारुंच्या जहाजात अडकले होते 15 भारतीय :
4 जानेवारी रोजी युके मॅरीटाईम ट्रेड ऑपरेशन्सच्या माहितीनूसार 4 जानेवारीला लाईबेरियाचा ध्वज असलेल्या मालवाहू जहाज नॉरफॉकला समुद्री लुटारुंनी हायजॅक केलं. युकेएमटीओ ही एक ब्रिटीश संघटना असून समुद्री मार्गावरील जहाजांवर या संघटनेच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. हायजॅक केलेल्या या जहाजात 15 भारतीय होते. त्यानंतर भारतीय नौदलाने कारवाईला सुरुवात केली नौदलाच्या आयएनएस आज या ठिकाणी पोहचलं होतं. या जहाजामध्ये पाच जणांकडे हत्यारं असल्याचीही माहिती नौदलाला मिळाली होती.

follow us