Indian Oil : उन्हाळ्यात तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. त्यामुळे नागरिक आपल्यासह वाहनांची काळजी घेत आहे. त्यासाठी अनेक सुरक्षित उपाय केले जातात. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजी, वाहनांची काय काळजी घ्यावी, असे मेसेज व्हायरल होत आहेत. वाहनातील इंधन टाकीत किती इंधन असावे, काय काळजी घ्यावी, याबाबत इंडियन ऑइलच्या नावाने एक मेसेज व्हॉटसअॅपवर व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजबाबत आपण सत्यता जाणून घेऊया..
शेतजमिनीची अदलाबदल करायची आहे … मग ही बातमी नक्की वाचा
इंडियन ऑइल कंपनीचा लोगो असलेल्या एक मेसेज व्हॉटसअॅप व्हायरल झाला आहे. इंडियन ऑइल चेतावणी देते-येत्या काही दिवसात तापमान वाढणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत तुमच्या वाहनात पेट्रोल भरू नका. यामुळे इंधन टाकीमध्ये स्फोट होऊ शकतो. कृपया तुमच्या वाहनातील इंधनाची अर्धी टाकी भरा आणि हवेसाठी जागा ठेवा. या आठवड्यात सर्वाधिक पेट्रोल भरल्यामुळे ५ स्फोटांचे अपघात झाले आहेत, असे मेसेजमध्ये म्हटले आहे.
Important announcement from #IndianOil. It is perfectly safe to fill fuel in vehicles up to the limit(max) as specified by the manufacturer irrespective of winter or summer. pic.twitter.com/IVKRNbWx5f
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) April 19, 2023
त्याचबरोबर काही सूचना देण्यात आल्या आहेत. कृपया दिवसातून एकदा पेट्रोलची टाकी उघडा आणि आत साचलेला गॅग बाहेर येऊ द्या, असे म्हटले आहे. हा संदेश तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि इतर सर्वांना पाठवा, असा उल्लेख करण्यात आला आहे.
राज्यात उन्हाचा पारा वाढला, आता लवकरच देशात लागू होणार एकच हिट प्लॅन
याबाबत लेट्सअपने सत्यता पडताळली आहे. इंडियन ऑइल कंपनीने यापूर्वीच या घटनेचे खंडण केले आहे. हा मेसेज खोटा असल्याचे कंपनीने 19 एप्रिल रोजी ट्वीट करून सांगितले आहे. हा मेसेज दर वर्षी उन्हाळ्यात व्हायरल होतो. वाहन उत्पादक कंपनीने आपले वाहने प्रत्येक परिस्थितीमध्ये चांगले कार्यरत रहावे, त्या पद्धतीने तयार केलेले आहेत. वाहनामध्ये पूर्ण क्षमतेने इंधन टाकणे हे पूर्णपणे सुरक्षित आहे. थंडी किंवा उन्हाळ्यात त्यावर काहीच परिणाम होत नाही, असे कंपनीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. या पध्दतीचे मेसेज हे गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे मेसेज खोटे असल्याचे दरवर्षी ऑइल कंपन्या स्पष्ट करत आहेत.