Download App

तीन राज्यात भाजपची सत्ता; शेअर बाजारात मोठी उलाढाल, गुंतवणुकदार मालामाल…

Share Market Update : देशातील तीन राज्यांत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर शेअर(Share Market) आज बाजारात मोठी उलाढाल झाल्याचं पाहायला मिळालंय. सेन्सेक्सने 1400 अंक तर निफ्टीने 430 अंकाने मुसंडी मारत नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. तर बँकिंग तसेच सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. तसेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज 6 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आजच्या व्यवहाराअखेरीस BSE सेन्सेक्स 1384 अंकांच्या उसळीसह 68,865 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 419 अंकांच्या उसळीसह 20,686 अंकांवर बंद झाला आहे.

पंतप्रधानांचे सुरक्षा प्रमुख ते राजकीय नेता अन् थेट मुख्यमंत्री! मिझोरामच राजकारण बदलणारा IPS

आज शेअर बाजारत सेन्सेक्स-निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठलायं, त्यामुळे बँक निफ्टीनेही 1668 अंकांच्या उसळीसह 46,484 अंकांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स आणि स्मॉल इंडेक्सचे शेअर उच्चांकावर बंद झाले आहेत. आजच्या व्यवहारात सरकारी आणि खाजगी दोन्ही बँकांच्या शेअर्समध्ये वाढ झालीयं.

अहंकारी आघाडीने आता तरी सुधरावं, नाहीतर जनता साफ करेल; पंतप्रधान मोदींचा इशारा

सरकारी कंपन्यांमध्येही मोठी खरेदी झाली असून सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 25 शेअर्स वाढीसह आणि 5 शेअर्स तोट्यासह बंद झाले आहेत. तर निफ्टीच्या 50 पैकी 45 शेअर्स 5 च्या वाढीवर बंद झाले आहेत. शेअर बाजारात झालेल्या उलाढालीमुळे BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ऐतिहासिक उच्चांकावर बंद झाले आहेत.

Telangana Election Result काॅंग्रेसचे रिसाॅर्ट पाॅलिटिक्स; आमदारांना नेण्यासाठी तीन बस तयार

आजच्या व्यवहारात मार्केट कॅप 343.45 लाख कोटी रुपये होते. तर मागील सत्रात मार्केट कपची किंमत 337.53 लाख कोटी रुपये होती. म्हणजेच आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 6 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

दरम्यान, आजच्या व्यापारात HPCL 8.96 टक्के, आयशर मोटर्स 7.43 टक्के, अंबुजा सिमेंट 7.36 टक्के, अदानी एंटरप्रायझेस 7.13 टक्के, ACC 6.28 टक्के, अदानी पोर्ट्स 6.14 टक्के हे सर्वात मोठे नफा होत असल्याचं दिसून आलं आहे. तर डेल्टा कॉर्प 3.77 टक्के, ल्युपिन 2.78 टक्के, ग्लेनमार्क 2.13 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज