Stock Market Today : अमेरिकेत झालेल्या मिडटर्म निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचा पराभव झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. इराण युद्ध, महागाई सारख्या प्रमुख कारणाने ट्रम्प यांच्या पक्षाचा पराभव झाल्यानंतर आता भारतीय शेअर बाजारात देखील जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.
गुरुवारी 5 नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजारात (Stock Market Today) सेन्सेक्स (Sensex) 1500 अंकांनी वाढला तर निफ्टी 50 (Nifty 50) देखील 24,400 च्या जवळ व्यवहार करताना दिसत आहे. मिडटर्म निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या पक्षाचा पराभव आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाल्याने देखील भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून येत आहे. ब्रेंट क्रूडच्या (Brent Crude) किमतीत आणखी 1 टक्क्यांची घसरण होऊन भाव 93.50 डॉलर प्रति बॅरलवर आला. त्याआधीच्या सत्रातही कच्च्या तेलाच्या किमतीत 8.7 टक्क्यांची मोठी घसरण झाली होती.
गोकुळ ताब्यात घेण्याचा डाव म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’; रोहित पवारांचा हल्लाबोल
याशिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची खरेदी बाजारासाठी सकारात्मक ठरली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी 7,284 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेत मिडटर्म निवडणुकीनंतर अमेरिकेतील प्रमुख निर्देशांकांमध्ये जोरदार तेजी दिसून आली. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.
धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, आज 4,800 रुपयांची मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर
