Download App

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सने 1000 अंकांनी वाढला, ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना फायदा

Share Market Today : नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी (28 एप्रिल, सोमवारी) भारतीय शेअर बाजारात (Indian Market Today) जबरदस्त तेजी

  • Written By: Last Updated:

Share Market Today : नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी (28 एप्रिल, सोमवारी) भारतीय शेअर बाजारात (Indian Market Today) जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. शुक्रवार, 25 एप्रिल रोजी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती त्यामुळे बाजारात अनेकांचे पैसे बुडाले होते मात्र आठवड्याच्या पाहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आल्याने गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.

आज भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स (Sensex) 1005 अंकांनी वाढला असून निफ्टीमध्ये देखील तेजी दिसून आली. आज बाजारात निफ्टी50 (Nifty 50) मध्ये 1.20 टक्क्यांची वाढ दिसून आली. सोमवारी व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 80,218.37 अंकांवर तर  निफ्टी50 24,328.50 वर बंद झाला. तर बीएसई मिडकॅप 568.30 अंकांनी किंवा 1.34% ने वाढून 43,097.01 वर बंद झाला.

या वाढीमुळे बाजारात आज  रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) , तेल आणि वायू, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. आज सर्वात जास्त फायदा तेल ते रसायन क्षेत्रातील दिग्गज रिलायन्स इंडस्ट्रीजला झाला.  त्यानंतर सन फार्मास्युटिकल्स, जेएसडब्ल्यू स्टील, बीईएल आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांचा क्रमांक लागतो.

बिलावल भुट्टोला असदुद्दीन ओवैसींनी दाखवली जागा, पहलगाम हल्ल्यावरुन पाकिस्तानावर हल्लाबोल 

तर दुसरीकडे निफ्टी50 मध्ये श्रीराम फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक वाढले. त्यानंतर एटरनल (झोमॅटो), अल्ट्राटेक सिमेंट्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांचा क्रमांक लागला. रिलायन्स इंडस्ट्रीज तिमाही निकालांनंतर  सोमवारच्या व्यवहारात निफ्टी ऑइल अँड गॅस 3.18% वाढून 11,132.10 वर पोहोचला. तर पीएसयू बँका आणि फार्मा शेअर्समध्ये अनुक्रमे 2.44% आणि 1.98% वाढ पाहायलया मिळाली.

माफी मागण्यासाठी शब्द नाही अन्…, विधानसभेत ओमर अब्दुल्ला भावुक

follow us