माफी मागण्यासाठी शब्द नाही अन्…, विधानसभेत ओमर अब्दुल्ला भावुक

माफी मागण्यासाठी शब्द नाही अन्…, विधानसभेत ओमर अब्दुल्ला भावुक

Omar Abdullah On Pahalgam Attack :  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) आज जम्मू आणि काश्मीर विधानसेभेत (Jammu and Kashmir Assembly) विशेष सत्र बोलवण्यात आले होते. विशेष अधिवेशनात या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 27 पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर दुसरीकडे या विशेष अधिवेशनात बोलताना जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) भावुक झाले.

विशेष अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, काही दिवसांपूर्वी आपण या सभागृहात होतो यावर माझा विश्वासच बसत नाही. अर्थसंकल्प आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. शेवटच्या दिवशी आम्ही चहा घेत होतो आणि विचार करत होतो की पुढचे सत्र काश्मीरमध्ये होईल. तेव्हा कोणीही विचार केला नव्हता की आपल्याला इथे या वातावरणात भेटावे लागेल. मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री या नात्याने आम्ही लोकांना इथे येण्याचे आमंत्रण दिले होते. यजमान असल्याने, सर्वांना येथून सुरक्षितपणे पाठवण्याची जबाबदारी माझी होती. पाठवू शकलो नाही. माफी मागण्यासाठी शब्दच नाही. मी त्यांना काय बोलावे? लहान मुलांना… ज्यांनी त्यांचे वडील रक्ताने माखलेले पाहिले. काही दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नौदल अधिकाऱ्याच्या विधवेला मी काय सांगू असं या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, काही लोकांनी मला विचारले की आमची चूक काय आहे? आम्ही काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच काश्मीरमध्ये सुट्टीसाठी आलो होतो आणि आता आम्हाला आयुष्यभर या सुट्टीची किंमत मोजावी लागेल.  आमच्या विनंतीवरून हे अधिवेशन बोलावणाऱ्या उपराज्यपालांचे मी आभार मानू इच्छितो.

या हल्ल्यानंतर आमच्या मंत्रिमंडळाने बैठक बोलावली तेव्हा असे ठरले की आम्ही उपराज्यपालांना एक दिवसाचे अधिवेशन बोलावण्याची विनंती करू. हे अधिवेशन बोलावण्यात आले कारण  राज्याच्या विधानसभेला त्या लोकांच्या वेदना आणि दुःखाची जाणीव आहे.

दहशतवादी 200 किलोमीटरपर्यंत आत कसे आले, घुसले कसे, पोलीस बंदोबस्त नव्हता का? विजय वडेट्टीवारांचा सवाल 

लोक आपल्या सोबत असतील तेव्हाच दहशतवाद किंवा अतिरेकीवाद संपेल. दहशतवादाविरुद्ध लोकांचा रोष पाहून, जर आपण योग्य पावले उचलली तर ही दहशतवादाच्या समाप्तीची सुरुवात आहे, असं देखील यावेळी ओमर अब्दुल्ला म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube