Download App

‘हे माझं शेवटचं ऑलिम्पिक होतं’; भारतीय बॅडमिंटन खेळाडू अश्विनी पोनप्पाकडून निवृत्तीची घोषणा

पॅरिस ऑलिम्पीकमध्ये सलग पराभवाला सामोर जाव लागल्यानंतर भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू अश्विनी पोनप्पाने निवृत्तीची घोषणा केली.

  • Written By: Last Updated:

Ashwini Ponnappa Retirement : भारतीय महिला दुहेरी संघात खेळणाऱ्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांना बॅडमिंटनमध्ये पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सलग (Paris Olympics) तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

इतकी वर्ष नेतृत्व करेल असं वाटलं नव्हत; भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाची निवृत्तीची घोषणा

अश्विनी आणि तनिषाला क गटातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सेटियाना मापासा आणि अँजेला यू यांच्याकडून 15-21, 10-21 असा पराभव पत्करावा लागला. पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवास संपल्यानंतर भारतीय बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा हिने निवृत्ती जाहीर केली. हे तिचे शेवटचं ऑलिम्पिक असल्याचं तिनं म्हटलं आहे.

अश्विनीने 2001 मध्ये तिचे पहिले राष्ट्रीय विजेतेपद जिंकले आणि ज्वाला गुट्टासह एक मजबूत आणि इतिहास घडवणारी महिला जोडी तयार केली. ज्वाला गुट्टा 2017 पर्यंत खेळली. तिने 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक आणि उबेर कप (2014 आणि 2016) आणि आशियाई चॅम्पियनशिप (2014) मध्ये कांस्य पदकांसह अनेक आंतरराष्ट्रीय पदके जिंकली होती.

अश्विनी आणि ज्वाला या दोन ऑलिम्पिकमध्ये (2012 आणि 2016) एकत्र खेळल्या पण प्राथमिक टप्प्याच्या पुढे त्यांना प्रगती करता आली नाही. दरम्यान, अश्विनी म्हणाली, आम्हाला आज जिंकायचं होतं. आम्हाला निकाल चांगला हवा होता, माझ्यासाठी आणि तनिषासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ऑलिम्पिकमध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला खूप लांबचा प्रवास करावा लागला. ते सोपं नव्हतं.”

कोल्हापूरच्या खेळाडूचा ऑलिम्पिकमध्ये धमाका, अचूक लक्ष्य  भेदून केला अंतिम फेरीत प्रवेश

34 वर्षीय अश्विनी तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळत असताना तिला 2028 च्या लॉस एंजेलिस गेम्समध्ये खेळायचं आहे का असं विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, ‘हे माझं शेवटचं ऑलिम्पिक असेल, पण तनिषाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. ती अश्रू रोखण्याचा प्रयत्न करीत म्हणाली. हे सोपं नाही, जर तुम्ही थोडं तरुण असाल तर तुम्ही हे सर्व हाताळू शकता. इतका वेळ खेळल्यानंतर मी आता ते घेऊ शकत नाही असंही ती म्हणाली आहे.

Tags

follow us