‘इतकी वर्ष नेतृत्व करेल असं वाटलं नव्हत’ भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाची निवृत्तीची घोषणा

‘इतकी वर्ष नेतृत्व करेल असं वाटलं नव्हत’ भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाची निवृत्तीची घोषणा

Rohan Bopanna Retirement : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपयश आल्यानंतर भारताचा स्टार टेनिस खेळाडू (Rohan Bopanna) रोहन बोपन्नाने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने थेट निवृत्ती जाहीर केली आहे. भारताकडून टेनिसमध्ये रोहन बोपन्ना आणि एन श्रीराम बालाजी यांनी सहभाग घेतला होता. या दोघांच्या जोडीला पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. रोहन बोपन्ना आणि एन श्रीराम बालाजी यांना 7-5, 6-2 असा पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, रोहन बोपन्ना यानं त्या सामन्यानंतर लगेच निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निर्णयाने क्रिडाप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. बोपन्नानं भारतासाठी जवळपास 22 वर्ष टेनिस खेळलं आहे.

Paris Olympics : मेडल मिळण्याआधीच खेळाडूंची चांदी! सॅमसंगनं दिलं मोठं गिफ्ट

ही माझ्या टेनिस करिअरची अखेरची स्पर्धा होती. एक खेळाडू म्हणून मी कुठं पोहोचलो आहे, हे मला माहिती आहे. मी जे आतापर्यंत केलं ते माझ्यासाठी एका यशाप्रमाणं आहे. भारताचं प्रतिनिधीत्व 20 वर्षांपेक्षा अधिक काळ करेन, असं कधी वाटलं नव्हतं. 2002 मध्ये पदार्पण आणि 22 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व केल्यानंतर निवृत्ती घेत आहे. मला या ऐतिहासिक कारकिर्दीवर गर्व आहे, अशा शब्दांत रोहन बोपन्नाने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

पराभव जिव्हारी

सध्या ऑलिम्पिक सुरु असतानाच रोहन बोपन्नाने निवृत्ती जाहीर केली. त्यामुळं 2026 मध्ये होणाऱ्या आशियाई गेम्स मध्ये देखील तो खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्जा यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक दिली होती. मात्र, त्यांना पदक जिंकता आलं नव्हतं. यावेळ एन. श्रीराम बालाजी याच्यासोबत पदक जिंकण्याची संधी होती. मात्र, फ्रान्सच्या गेल मोनफिल्स आणि रॉजर वेसेलिन यांच्या जोडीनं त्यांना पराभूत केलं.

Paris Olympics 2024 : अर्जेंटिनाला धक्का, हॉकीमध्ये भारताने पुन्हा केली कमाल, सामना अनिर्णित

रोहन बोपन्नाने त्याच्या ऐतिहासिक टेनिस करिअरमध्ये 6 वेळा दुहेरी स्पर्धेत ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यापैकी 2 वेळा ग्रँड स्लॅमचं विजेतेपद मिळालं. 2017 मध्ये कॅनडाच्या गेब्रियला डैब्रोवस्की यांच्यासोबत मिश्र दुहेरीचं फ्रेंच ओपनचं विजेतेपद बोपन्ना याने मिळवलं. 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅत्यू एब्डन सोबत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा देखील त्याने जिंकली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube