Download App

पाकिस्तान, तुर्कीनंतर आता चीन; भारताने चायनाला दिला मोठा दणका, वाचा, नक्की काय घडलं?

चीन सुरुवातीपासूनच पाकिस्तानला पाठिंबा देत आला आहे, कधी उघडपणे तर कधी छुप्या पद्धतीनं चीनने पाकिस्तानला भारताविरोधात

India Pakistan War : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण आहे. पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यासाठी तुर्कीनं पाकिस्तानला मदत केली. (India) पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी जवळपास 350 तुर्कीचे ड्रोन वापरले, तुर्कीने पाकिस्तानला मदत केल्याची मोठी किंमत आता त्यांनी चुकवावी लागत आहे, भारताकडून तुर्कीच्या मालावर बहिष्कार घालण्यात आला आहे.

चीन सुरुवातीपासूनच पाकिस्तानला पाठिंबा देत आला आहे, कधी उघडपणे तर कधी छुप्या पद्धतीनं चीनने पाकिस्तानला भारताविरोधात पाठिंबा दिला आहे, आता याचा मोठा फटका हा चीनला देखील बसला आहे. चीनची प्रमुख स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या श्याओमीच्या उत्पनाचे आकडे समोर आले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीला मोठा झटका बसला आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी या कंपनीचं भारतातील उत्पन्न अर्ध्यावर आलं आहे, कंपनीच्या उत्पन्नामध्ये तब्बल 45 टक्क्यांची घसरण झाली आहे.

पाकिस्तानसोबत क्रिकेट नाही, बीसीसीआय घेणार हा मोठा निर्णय

मार्केट रिसर्च फर्म कॅनलिसच्या डेटा रिपोर्टनुसार, श्याओमीला चालू आर्थिक वर्षामध्ये पहिल्या तिमाहीत जीएसटी वगळून 47.2 मिलियन डॉलरचं उत्पन्न झालं आहे. मात्र, गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत या कंपनीचं उत्पन्न जीएसटी वगळून 85.3 मिलियन डॉलर एवढं होतं. याचाच अर्थ या कंपनीच्या उत्पन्नामध्ये तब्बल पन्नास टक्के एवढी मोठी घट झाली आहे. याचा मोठा फटका हा कंपनीला बसला आहे.

दुसरीकडे भारतीय व्यापाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे, तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार घातल्यामुळे याचा मोठा फटका हा तुर्कस्थानला बसला आहे. केवळ व्यापारीच नाही तर भारतातील चित्रपट व्यावसायिकांनी देखील तुर्कीमधील चित्रिकरणावर बहिष्कार घातला आहे. इथून पुढे तुर्कस्थानामध्ये एकाही चित्रपटाचं चित्रिकरण होणार नाही, अशी भूमिका चित्रपट व्यावसायिकांनी घेतली आहे. भारतीय पर्यटकांनी देखील तुर्कस्थानाकडे पाठ फिरवली आहे. याचा मोठा फटका हा तुर्कस्थानला बसला आहे.

follow us