Download App

‘ट्रम्प टॅरिफ’मुळे भारताला बसेल 52 लाख कोटींचा फटका! कोणत्या क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान, जाणुन घ्या

India’s loss of 52 lakh crore due to Trump tariffs these sector suffer most : अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे भारताला 52 लाख कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान होऊ शकते. हा दावा ब्रोकरेज फर्म जेफरीज येथील इक्विटी स्ट्रॅटेजी विभागाचे ग्लोबल हेड क्रिस्टोफर वूड यांनी केला आहे. वुड यांनी त्यांच्या ‘ग्रीड अँड फियर’ या साप्ताहिक वृत्तपत्रात म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या 50% टॅरिफमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला 55-60 अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल. वस्त्रोद्योग, पादत्राणे, दागिने आणि रत्ने यासारख्या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसेल असे वूड म्हणाले.

Video : थोड्याचवेळात जरांगेंना मिळणार गुडन्यूज; आंदोलनाची वेळ संपण्यापूर्वी फडणवीसांनी दिले संकेत

भारतावरील टॅरिफ हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील नाराजीचा परिणाम असल्याचा दावा वूड यांनी केला आहे. कारण मे महिन्यात भारताने पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीत ट्रम्पची भूमिका स्पष्टपणे नाकारली होती. हे श्रेय ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार जिंकण्याचे एक साधन ठरू शकले असते. ट्रम्प यांच्या नाराजीचे आणखी एक कारण म्हणजे रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात त्यांना आलेले अपयश. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर निशाणा साधण्याचे हेच कारण आहे.

‘न्याय मागण्यासाठी मराठी माणूस सूरतला जाणार का…?’ मराठा आरक्षणावर काय म्हणाले उद्धव ठाकरे

भारताची बाजू योग्य

भारत आणि अमेरिका एका मोठ्या व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या जवळ असताना हा टॅरिफ लादण्यात आला. दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर हा करार अडून राहिला होता. त्यातला शेती हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. वुड यांनी भारताची बाजू घेत म्हटले आहे की, कोणत्याही देशाचे सरकार आपल्या देशाचे कृषी क्षेत्र परदेशी आयातीसाठी खुले करणार नाही कारण त्याचा थेट परिणाम गरीब शेतकऱ्यांवर होईल. भारतात, शेती सुमारे 25 कोटी शेतकरी आणि कामगारांच्या उत्पन्नाचे स्रोत आहे. भारतातील जवळजवळ 40 टक्के कामगारांना केवळ शेतीचे क्षेत्र रोजगार देते.

जपानचा अमेरिकेला दणका! अब्जावधी रुपयांची मोठी डील थांबवली; मोदींच्या जपान भेटीचा इफेक्ट?

सरकार टॅरिफचा सामना करण्यास सज्ज

वुड यांनी टॅरिफमुळे आर्थिक मंदीच्या चिंतेवरही भर दिला. ते म्हणाले की, चालू तिमाहीत जीडीपी वाढीचा दर फक्त 8 टक्के राहण्याची अपेक्षा आहे, तर अलिकडच्या काळात तो 10-12% दरम्यान होता. जेफरीजच्या इंडिया ऑफिसचा अंदाज आहे की, 2025 मधील 10 टक्के वाढ घसरून 2026 मध्ये 8.59% पर्यंत जाऊ शकते. हा जीडीपी दर कोविडची वर्षे वगळता गेल्या 20 वर्षातील सर्वात कमी दर असेल. परंतू, सरकार या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पावले उचलत आहे. आधी अर्थसंकल्पातून प्राप्तिकरात कपात करण्याची घोषणा करण्यात आली आणि आता जीएसटीमध्ये मोठे बदल करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. जीएसटीमधील आधीचे चार कर स्लॅब आता फक्त दोन 5% आणि 18% असे कमी केले जात आहेत.

“मनोज जरांगेंची मागणी कायद्याला धरून, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण..”, उल्हास बापट नेमकं काय म्हणाले?

लघु उद्योगांचे सर्वाधिक नुकसान
अमेरिकेच्या 50% टॅरिफचा थेट परिणाम बहुतेक मोठ्या लिस्टेड कंपन्यांवर होणार नाही, परंतु टॅरिफ लघु आणि मध्यम उद्योगांना (एसएमई) धोकादायक ठरू शकतो. हे असे उद्योग आहेत जे जास्त रोजगार देतात. वुड यांनी इशारा दिला आहे की, यामुळे मायक्रोफायनान्स आणि ग्राहक वित्त कंपन्यांना नुकसान होऊ शकते आणि जर हे शुल्क दीर्घकाळ कायम राहिले तर जीडीपी 11.2 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. चांगली गोष्ट म्हणजे टॅरिफमुळे भारत आणि चीन जवळ येत आहेत. सप्टेंबरमध्ये, पाच वर्षांनी दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवा सुरू होत आहे. वुड यांनी ट्रम्पचा हा निर्णय अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या विरुद्ध असल्याचे सांगितले आहे. कारण भारताला चीनकडे ढकलणे अमेरिकेच्या हिताचे असू शकत नाही असे ते म्हणाले.

follow us