Download App

शेअर बाजारातील घसरण कायम; सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या आजची स्थिती काय?

गोल्डमॅनने म्हटलं की भारतीय बाजार संरचनात्मकदृष्ट्या मजबूत दिसत आहे पण आर्थिक वाढ आणि कॉर्पोरेट नफा घसरत आहे. ब्रोकरेजनुसार संरचनात्मक

  • Written By: Last Updated:

Stock Market Update : शेअर बाजारातील घसरण थांबायचं नाव घेत नाही. जागतिक रेटिंग एन्जसीच्या अलीकडच्या अहवालाने गुंतवणूकदारांची डोकेदुखी आणखी वाढू शकते. आज सकाळी देशांतर्गत बाजारातील गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे जे अलीकडच्या घसरणीनंतर दिवाळीच्या आसपास कमाईची संधी शोधात आहेत. जगातील नामांकित ब्रोकरेज फर्मने भारताचे रेटिंग कमी केलं आहे.

गोल्डमॅनने म्हटलं की भारतीय बाजार संरचनात्मकदृष्ट्या मजबूत दिसत आहे पण आर्थिक वाढ आणि कॉर्पोरेट नफा घसरत आहे. ब्रोकरेजनुसार संरचनात्मक सुधारणा चालू आहेत त्यामुळे, भारत अजूनही गुंतवणुकीसाठी आकर्षक स्थान आहे पण आर्थिक वाढ आणि कॉर्पोरेट नफा कमी होत असल्यामुळे रेटिंग कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं गोल्डमॅन सॅक्सनं म्हटलं. महागड्या मूल्यांकनामुळे येत्या काही दिवसांत शेअर बाजारात आणखी काही दिवस घसरण होऊ शकते. मात्र, प्रचंड देशांतर्गत गुंतवणुकीमुळे बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता नाही.

डॉ. अजित रानडे यांना न्यायालयाचा मोठा दिलासा; कुलगुरू पदावरून बडतर्फ करण्याचा आदेश घेतला मागे

गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार पुढील तीन ते सहा महिन्यांत देशांतर्गत बाजारात वेळ सुधारणा होण्याची शक्यता आहे. आशिया/इमर्जिंग मार्केट स्ट्रॅटेजी अंतर्गत शेअर बाजारातील गुंतवणूक कमी झाली त्यामुळे, भारतीय शेअर बाजाराचे रेटिंग ओव्हरवेटवरून न्यूट्रल करण्यात आले आहेत. त्याचवेळी गोल्डमॅनने १२ महिन्यांचे निफ्टी लक्ष्य २७००० पर्यंत कमी केले जे यापूर्वी २७,५०० होते पण सध्याच्या पातळीपेक्षा ९% वाढ दर्शवत आहे.

याशिवाय ब्रोकरेजने ऑटो, टेलिकॉम, इन्शुरन्स, रियल्टी (अपग्रेड केलेले) आणि इंटरनेट (अपग्रेड केलेले) वर ओव्हरवेट रेटिंग दिले तर औद्योगिक, सिमेंट/केमिकल्स आणि फायनान्शिअल रेटिंग कमी केले. त्याचबरोबरो ब्रोकरेजने काही क्षेत्रांचे रेटिंग अपग्रेड केले तर काहींना डाउनग्रेड केले. तसंच, ब्रोकरेजने म्हटले की उच्च मूल्यांकन आणि कमी अनुकूल वातावरणामुळे नजीकच्या काळात बाजारात मर्यादेत दिसत आहे.

follow us