World Teacher’s Day : जागतिक शिक्षक दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या महत्वाची माहिती

World Teacher’s Day : जागतिक शिक्षक दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या महत्वाची माहिती

World Teacher’s Day : जगभरातील शिक्षक, शोधकर्ते आणि प्राध्यापकांना नवी ओळख देण्यासाठी दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी जागतिक शिक्षक दिन साजरा (World Teacher’s Day 2024) केला जातो. भारतात मात्र 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. पण जागतिक शिक्षक दिवसामागे असा कोणताच उद्देश नाही. जागतिक शिक्षक दिवस सर्व प्रथम 1994 मध्ये साजरा करण्यात आला होता.

युनेस्कोने दिली होती मान्यता

सन 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या शिफारशीनंतर युनेस्कोने (UNESCO) शिक्षकांच्या परिस्थितीबाबत चिंता या कागदपत्रांवर सही केली होती. परंतु 1994 मध्ये  स्थापित करण्यात आले. शिक्षकांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या, प्रशिक्षण, रोजगार आणि काम करण्याच्या स्थितीबाबत मानके निश्चित करते. या मागचा उद्देश व्यापक आहे.  जगभरातील शिक्षकांची काय परिस्थिती आहे, शिक्षणाची परिस्थिती काय आहे, त्यांना कोणत्या समस्या जाणवतात यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात येते.

Teacher’s Day : दरवर्षी ५ सप्टेंबरलाच का साजरा करतात शिक्षक दिन; जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

यावर्षी थीम काय

जागतिक शिक्षक दिनाची या वर्षीची थीम खास आहे. ‘शिक्षकांच्या आवाजाला महत्व: शिक्षणासाठी नव्या सामाजिक अनुबंधांकडे’ अशी आहे. प्रत्येक वर्षी शिक्षक दिनाची थीम वेगळी असते. शिक्षणाच्या क्षेत्रातील आव्हाने आणि वाटचाली बाबत माहिती देत असते. मागील काही वर्षांतील थीमचा विचार केला तर शिक्षकांचे अधिकार, डिजिटल शिक्षण आणि कोविड संकटाच्या काळातील शिक्षणासमोरील आव्हाने असे विषय घेण्यात आले होते.

१०० पेक्षा जास्त देशांत शिक्षक दिवस

जगभरातील १०० पेक्षा जास्त देशांत शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. जगभरातील शिक्षकांसमोरील आव्हाने, शिक्षणाची परिस्थिती, अपर्याप्त परिस्थिती अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येते. भारतात मात्र ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. भारतात या दिवसाचे खास महत्व आहे. आपल्या गुरुजनांचा सन्मानाची भावना यामागे आहे.

Rockstar DSP On Teachers Day: शिक्षक दिनानिमित्त रॉकस्टारने मानले खास व्यक्तीचे आभार !

follow us
  • fb
  • instagram
  • youtube