डॉ. अजित रानडे यांना न्यायालयाचा मोठा दिलासा; कुलगुरू पदावरून बडतर्फ करण्याचा आदेश घेतला मागे
Order Dismiss Ajit Ranade Post of VC Reversed : अर्थतज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक डॉ. अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून बडतर्फ करण्याचा आदेश मागे घेत असल्याची माहिती गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था या अभिमत विद्यापीठाने उच्च न्यायालयाला दिली. त्यामुळे डॉ. रानडे यांना दिलासा मिळाला आहे.
बडतर्फीच्या आदेशापूर्वी डॉ. रानडे यांची बाजू न ऐकल्याने नैसर्गिक न्यायतत्त्वाचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळे रानडे यांच्याबाबतीत सुनावणी घेऊन निर्णय घेतला जाईल, असं गोखले इन्स्टिट्यूटने उच्च न्यायालयाला सांगितलं. गोखले इन्स्टिट्यूटने ही माहिती दिल्यावर न्या. महेश सोनक आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने डॉ. रानडे यांची आव्हान याचिका निकाली काढली.
जो भावाचा नाही झाला तो जनतेचा काय होणार?, केदा आहेर यांची राहुल आहेर यांच्यावर घणाघाती टीका
गोखले संस्थेने १४ सप्टेंबर रोजी डॉ. रानडे यांना कुलगुरू पदावरून हटवल्याचा निर्णय कळवला. या निर्णयाला डॉ. रानडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. याचिका प्रलंबित असेपर्यंत आपल्याला दिलासा देण्यात यावा, अशीही मागणी रानडे यांनी याचिकेद्वारे केली होती.
तत्त्वांचं उल्लंघन
डॉ. रानडे यांची नियुक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करत असल्याचं निदर्शनास आल्यावर संस्थेने रानडे यांना कुलगुरू पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला डॉ. रानडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.