Gautam Adani : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) नेहमी सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत राहतात. कधी आपल्या व्यवसायामळे तर कधी शेअर बाजारामुळे (Stock Market) गौतम अदानी सोशल मीडियावर चर्चेत असतात. तर त्यांनी एका मुलखातीमध्ये वर्क लाईफ बॅलन्सबद्दल (Work Life Balance) प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा गौतम अदानी चर्चेत आले आहे.
वर्क लाईफ बॅलन्सची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांना एका चौकटीत ठेवू शकत नाही. असं त्यांनी म्हटले आहे. जर तुम्ही करत असलेल्या कामाचा तुम्हाला आनंद वाटत असेल तर तुमच्याकडे कामाचे आयुष्य शिल्लक आहे. वर्क लाईफ बॅलन्सची कोणतीही विशिष्ट व्याख्या कोणावरही लादू नये. असेही ते म्हणाले.
एका मुलाखतीमध्ये बोलताना गौतम अदानी म्हणाले की, तुम्ही करत असलेले काम जर तुमच्यावर लादले गेले नसेल, तर तुम्ही नक्कीच तुमचे आयुष्य योग्यरित्या संतुलित करत आहात. कामाच्या दरम्यान, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किती वेळ घालवत आहात हे लक्षात ठेवावे लागेल. मी माझ्या कुटुंबासोबत दिवसाचे 4 तास घालवतो आणि मी त्याचा आनंद घेतो. कदाचित एखाद्याने आपल्या कुटुंबासोबत आठ तास घालवले तर ते आनंदी असेल. यावर प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. पण जर एखादी व्यक्ती वर्क लाईफ बॅलन्सची कोणत्याही एका व्याख्येनुसार घरी 8 तास घालवत असेल आणि तरीही त्याची बायको त्याला सोडून गेली तर ती वेगळीच गोष्ट बनते.
#WATCH | Delhi | On work-life balance, Adani Group Chairman, Gautam Adani says, “Your work-life is balanced when you do things which you like doing…” pic.twitter.com/ePDdhJuL9W
— ANI (@ANI) December 26, 2024
या मुलाखतीमध्ये पुढे बोलताना गौतम अदानी म्हणाले की, तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करत आहात आणि तुम्ही ते करताना आनंदी आहात की नाही यावर वर्क लाईफ बॅलन्स अवलंबून आहे. हे सर्वस्वी परस्पर आनंद आणि वैयक्तिक समाधानावर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात आणि आयुष्यात आनंदी असता आणि तुमचा जोडीदारही आनंदी असतो, तेव्हा हीच खरी वर्क लाईफ बॅलन्सची व्याख्या आहे. असं देखील ते म्हणाले.
मोठी बातमी! प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानावर अखेर आमदार सुरेश धसांकडून दिलीगिरी
इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांनी आठवड्यातून 70 तास काम करण्याच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वर्क लाईफ बॅलन्सची चर्चा जोराने सुरु आहे. जर भारताला जगातील महासत्ता बनायचे असेल आणि भारताला जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांसमोर उभे करायचे असेल तर भारतीयांना हे समर्पण दाखवावे लागेल. असं इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती म्हणाले होते.