पंतप्रधान मोदींचे 81 देशांचे दौरे अन् 900 कोटी खर्च; संसदेत परदेश दौऱ्यावर माहिती

Narendra Modi Visited 81 Countries : पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या फिलीपिन्सच्या दौऱ्यावरुन बुधवारी (18 नोव्हेंबर) रोजी सकाळी परतले आहे.

Narendra Modi Visited 81 Countries

Narendra Modi Visited 81 Countries

Narendra Modi Visited 81 Countries : पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या फिलीपिन्सच्या दौऱ्यावरुन बुधवारी (18 नोव्हेंबर) रोजी सकाळी परतले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या दौऱ्यावर आसियान (ASEAN) आणि ‘क्वाड’ (Quad) शिखर परिषदांमध्ये भाग घेतला. याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी विविध मुद्द्यावर चर्चा देखील केली. तर दुसरीकडे आता संसदेत पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यांचा तपशील देण्यात आले आहे.

परदेश दौऱ्यांचा तपशील: जून 2014 ते जुलै 2026 

संसदेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जून 2014 ते जुलै 2026 या काळात पंतप्रधानांनी 81 देशांमध्ये एकूण 183 दौरे केले. या दौऱ्यांसाठी सरकारी तिजोरीतून 900 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. जुलै 2026  नंतर पंतप्रधान मोदींनी आणखी तीन परदेश दौरे केले आहेत, मात्र त्यावरील खर्चाचा तपशील अद्याप जाहीर झालेला नाही. परराष्ट्र मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी कोणत्या देशांना सर्वाधिक भेटी दिल्या आहेत?

परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आपल्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेला सर्वाधिक 10 वेळा भेट दिली आहे. त्यानंतर संयुक्त अरब अमिराती (UAE), जपान (Japan) आणि फ्रान्सचा (France) क्रमांक लागतो, ज्यांच्या प्रत्येकी 8 भेटी त्यांनी घेतल्या आहेत. 2019 मध्ये झालेला त्यांचा अमेरिका दौरा हा त्यांच्या सर्वात महागड्या दौऱ्यांपैकी एक होता.

2015 मध्ये सर्वाधिक परदेश दौरे  

या दौऱ्यासाठी सुमारे 37.7 कोटी रुपये खर्च झाले होते. याच काळात त्यांनी ह्युस्टन येथे आयोजित ‘हाउडी मोदी’ (Howdy Modi) कार्यक्रमातही सहभाग घेतला होता, ज्यामध्ये सुमारे 50,000 लोक उपस्थित होते. आकडेवारीनुसार, 2015 मध्ये मोदींनी सर्वाधिक 28 परदेश दौरे केले होते. या काळात त्यांनी अमेरिका, युनायटेड किंगडम आणि चीनसह अनेक देशांना भेटी दिल्या. त्याच वर्षी, त्यांनी पाकिस्तानमधील लाहोर येथे अनियोजित भेट देऊन तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांचीही भेट घेतली होती. दरम्यान, 2025 मध्ये पंतप्रधान मोदींनी 23 देशांना भेटी दिल्या. या दौऱ्यांवर किमान 187.8 कोटी रुपये खर्च झाले ही रक्कम 2015 मधील 91.5 कोटी रुपयांच्या खर्चाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे.

तब्बू वाईआरएफ एंटरटेनमेंटच्या नेटफ्लिक्स सीरिज ‘टनल मेन’मध्ये झळकणार

मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 96 देशांचे दौरे

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मे 2004 ते मे 2014  या त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 96 देशांचे दौरे केले होते. तर मे 2014 ते मे 2024 या त्यांच्या पहिल्या दशकाच्या कार्यकाळात मोदींनी 133 परदेश दौरे केले. मनमोहन सिंग यांनी सर्वाधिक वेळा 10 वेळा अमेरिकेला भेट दिली होती. याव्यतिरिक्त, त्यांनी रशियाला 9 वेळा, तर जपान आणि जर्मनीला प्रत्येकी 5 वेळा भेटी दिल्या होत्या. मात्र, त्यांच्या परदेश दौऱ्यांवरील एकूण खर्चाचा तपशील उपलब्ध नाही. त्यांच्या कार्यकाळात चार्टर्ड विमानांवर सुमारे 795 कोटी रुपये खर्च झाले होते.

Exit mobile version