गुंतवणूक सल्लागार भाजप समर्थक! राहुल गांधी म्हणाले, … पण माझ्या गुंतवणुकीवरील परतावा थोडा वेगाने वाढवा

Investment advisor Rahul Gandhi यांनी त्यांच्या गुंतवणूक सल्लागारांच्या एका पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

Rrahul Gandhi

Rrahul Gandhi

Investment advisor BJP supporter Rahul Gandhi increase returns on my investment a little faster : राहुल गांधी यांचे गुंतवणूक सल्लागार Muthukrishnan Dhandapani यांच्या एका पोस्टवर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आणि सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. त्यावर ते म्हणाले की, ही प्रतिक्रिया गुंतवणूक सल्लागार Muthukrishnan Dhandapani यांच्या एका सोशल मीडिया पोस्टवर आली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, भाजपला आपला पाठिंबा असल्याची माहिती असूनही राहुल गांधी यांनी कधीही त्यांच्या व्यावसायिक सेवांवर किंवा राजकीय विचारांवर प्रश्न उपस्थित केला नाही.

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजेने’चे पैसे बंद

X वरील पोस्टमध्ये धंदापानी यांनी लिहिले, “मी कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करणार नाही. पण लोकांची धारणा आणि प्रत्यक्ष वास्तव यात किती फरक असतो, हे दाखवण्यासाठी हा अनुभव सांगत आहे. हे कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्याचा प्रचार करण्यासाठी नाही. त्यांनी सांगितले की, 2013 मध्ये राहुल गांधींसोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने त्यांचे नाव म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी सुचवले होते. तेव्हापासून, यूपीए-2 सरकारच्या काळापासून ते आजपर्यंत राहुल गांधी हे त्यांच्या ग्राहकांपैकी एक आहेत.

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”>Muthu ji, your political views are your own – but please do speed up the returns on my investments. 😃 <a href=”https://t.co/KChEdFK11H”>https://t.co/KChEdFK11H</a></p>&mdash; Rahul Gandhi (@RahulGandhi) <a href=”https://twitter.com/RahulGandhi/status/2053469457289449942?ref_src=twsrc%5Etfw”>May 10, 2026</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

धंदापानी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांत त्यांची राहुल गांधींसोबत ई-मेल आणि फोनवरून अनेकदा चर्चा झाली. “मी 2014 ते 2024 या काळात पंतप्रधान Narendra Modi यांचा ठाम समर्थक राहिलो आहे. तरीही राहुल गांधी किंवा त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कधीही हा मुद्दा माझ्यासमोर आणला नाही,” असे त्यांनी नमूद केले.

मुंबई, लखनौचे पॅकअप; प्ले ऑफ शर्यतीसाठी आता कोणते संघ आघाडीवर ?

त्यांच्या मते, राहुल गांधी व्यावसायिक सेवा आणि वैयक्तिक राजकीय मत यामध्ये स्पष्ट फरक ठेवतात. “माझे ट्वीट त्यांच्या टीमकडून नियमितपणे पाहिले जात असतील, तरीही त्यांनी कधीही त्याचा व्यावसायिक नात्यावर परिणाम होऊ दिला नाही,” असेही धंदापानी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी प्रत्येक वेळी आदराने संवाद साधतात आणि कधीही अहंकारी वर्तन करत नाहीत. भाजप समर्थक असल्याचे माहित असूनही काही वर्षांपूर्वी एका महत्त्वाच्या व्यावसायिक निवडीसाठी राहुल गांधींनी त्यांचे मत विचारले होते. धंदापानी यांनी असेही म्हटले की, “या पोस्टमुळे आमचे व्यावसायिक संबंध संपुष्टात येऊ शकतात. पण प्रत्येक गोष्टीचा शेवट एक दिवस होतोच.”

मराठी कलाकारांची ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ रंगणार; ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे शानदार समारंभात अनावरण

मुख्य प्रवाहातील मीडिया आणि विविध पक्षांच्या आयटी सेलमुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिमा पूर्णपणे वेगळी दाखवली जाते, असे सांगत त्यांनी लोकांना कोणत्याही पक्षाच्या प्रचार यंत्रणेवर आंधळा विश्वास ठेवू नका, असा सल्लाही दिला. धंदापानी यांच्या पोस्टला उत्तर देताना राहुल गांधी यांनी हलक्या-फुलक्या अंदाजात लिहिले, “मुथुजी, तुमचे राजकीय विचार तुमचे आहेत, पण कृपया माझ्या गुंतवणुकीवरील परतावा थोडा जलद वाढवा.” राहुल गांधींच्या या प्रतिक्रियेमुळे आपल्याला आनंददायी धक्का बसल्याचे धंदापानी यांनी नंतर सांगितले.

 

Exit mobile version