Download App

Ayodhya Ram Mandir : आधी टाळलं, नंतर बोलावलं! प्राणप्रतिष्ठेसाठी या, शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंदिर ट्रस्टने अनेक व्हिआयपी मंडळी आणि राजकारणी नेत्यांना निमंत्रणे धाडली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले नव्हते. यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. दोन्ही पक्षांकडून भाजपवर जोरदार हल्ले केले जात होते. अखेर आता याचा फटका बसू शकतो याचा अंदाज आल्याने शहाणपण सुचलं आहे. रामजन्मभूमी मंदिर न्यास आणि विश्व हिंदू परिषदेने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केल्याची माहिती मिळाली आहे.

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : श्रीरामांच्या त्रेता युगाची आठवण करून देणारं आयोध्या स्टेशन!

या सोहळ्यासाठी या दोन्ही नेत्यांना टाळण्यात आलं होतं. मला राम मंदिरांच निमंत्रण मिळालं नाही जरी मिळालं तरी मी जाणार नाही, असे शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना निमंत्रण नसल्याने खासदार संजय राऊत रोजच भाजपवर आगपाखड करत होते. राम मंदिराचं उद्घाटन म्हणजे भाजपाचा राजकीय कार्यक्रम आहे. त्यांचा पॉलिटिकल इव्हेंट झाल्यानंतर आम्ही अयोध्येला जाऊ असे संजय राऊत कालच म्हणाले होते. या मुद्द्यावर राज्यात वाद वाढत चालला होता. तसेच याचा राजकीय फटकाही बसू शकतो याचा अंदाजआल्याने निर्णयात बदल केल्याची माहिती मिळाली. राम जन्मभूमी मंदिर न्यासाने या दोन्ही नेत्यांना निमंत्रण पाठविल्यातची माहिती आहे.

आम्ही सर्वांना बोलावलं, कुणालाच टाळलं नाही – आलोक कुमार 

याशिवाय समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. सोहळ्यासाठी राजकीय पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. आम्ही कुणालाही टाळलेलं नाही. सर्वांनी सोहळ्याला यावे. हा सर्वांत शुभ सोहळा आहे, त्यात राजकारण करू नय असे विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले.

‘भाजपचं राजकारण की व्यवसाय माहित नाही’; राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शरद पवारांचे खडेबोल

दरम्यान, निमंत्रण मिळालं तरी कार्यक्रमाला जाणार नाही असे शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे. आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात. ते देखील शरद पवार यांच्याप्रमाणेच निर्णय घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us