Download App

‘चांद्रयान 3’ चंद्रावर उतरल्यानंतर पंतप्रधान मोदींचे पहिले विधान, अभिमानास्पद…

Chandrayaan 3 Landing : जगभरातील सर्वांचच लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-3 अखेर चंद्रावर सुरक्षितपणे लॅंडिंग केलं आहे. चांद्रयान-3 चंद्रावर उतरल्यानंतर भारताने आज इतिहास घडवला आहे. आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर चांद्रयान-3 यशस्वीपणे लॅंडिंग झालं. चांद्रयान लॅंडिग होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांचं अभिनंदन केलं.

Haddi Trailer: धडाकेबाज ॲक्शन अन् ड्रामा… नवाजुद्दीनच्या ‘हड्डी’ चा ‘भयानक’ ट्रेलर प्रदर्शित

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या टीमचं अभिनंदन केलं. यावेळी ते म्हणाले, की, आज चंद्रावर चांद्रयान-3 लॅंडिंग झालं आहे. ही घटना ऐतिहासिक, अभिमानास्पद आहे. हा क्षण ऐतिहासिक असून अभूतपूर्व आहे. तसेच भारताच्या विकासाठी एक महत्वाचा टप्पा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

कष्टातून 25 लाख गोळा केले, पत्नीला परदेशात पाठविले… अन् तिने लॅन्ड होताच तोडले पतीशी संबंध

पीएम मोदी म्हणाले, आयुष्य धन्य झाले आहे. विजयाच्या मार्गावर चालण्याचा हा क्षण आहे. आज प्रत्येक घरात सेलिब्रेशन सुरू झाले आहे. मी चांद्रयान-3 च्या टीमचे आणि देशातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. ते म्हणाले की शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे आपण दक्षिण ध्रुवावर पोहोचलो आहोत जिथे कोणीही पोहोचू शकले नाही. आज सर्व समज बदलतील. आपण पृथ्वी माता आणि चंद्राला मामा म्हणतो.

भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने उंचावली आहे. जनतेचा उर आनंदाने भरुन आला आहे. आज प्रत्येकजण इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत प्रत्येकजण एवढच म्हणत आहे की, गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा. कारण भारताच्या चांद्रयानाने चंद्राला अलिंगन दिलं आहे. इस्त्रोचे यान चंद्राच्या कुशीत शिरलं आहे. विशेष म्हणजे आधीच्या चंद्रमोहिमांच्या अपयशाची जळमटं क्षणार्धात कुठल्या कुठं झटकून टाकली आहे. भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला आहे.

Tags

follow us