कष्टातून 25 लाख गोळा केले, पत्नीला परदेशात पाठविले… अन् तिने लॅन्ड होताच तोडले पतीशी संबंध

कष्टातून 25 लाख गोळा केले, पत्नीला परदेशात पाठविले… अन् तिने लॅन्ड होताच तोडले पतीशी संबंध

मागील काही दिवसांपूर्वी एसडीएम ज्योती मौर्य प्रकरण चर्चेत होतं. अधिकारी होताच पत्नीनं शिपाई असलेल्या पतीचा विश्वासघात केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता. त्यानंतर अनेक पतींनी त्यांच्या पत्नीचे काम आणि अभ्यास बंद केला. क्लास बंद केले. आपलीही पत्नी पुढे जाऊन असाच विश्वासघात करेल आणि साथ सोडेल अशी भीती अनेकांच्या मनात बसली. दरम्यान, आता आणखी एक अशीच घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. (Gurpinder Singh, a resident of Makarandpur village in Pilibhit district of Uttar Pradesh, was cheated by his wife)

उत्तर प्रदेशमधील पीलीभीत जिल्ह्यातील मकरंदपूर गावातील रहिवासी गुरपिंदर सिंग या तरुणाची पत्नीने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार, काबाडकष्ट करुन त्यांनी तब्बल 25 लाख जमा केले आणि पत्नीला जॉबसाठी कॅनडाला पाठविले. भारतातून जाण्यापूर्वी पत्नीने आपल्यालाही काहीच दिवसात कॅनडाला बोलवून घेऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र कॅनडाला पोहचता पत्नीने आपल्याशी सगळा संपर्कच तोडला, असा दावा केला आहे. या प्रकरणी पत्नीसह तिच्या माहेरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला आहे.

सासरच्यांनी केली मारहाण :

गुरपिंदर सिंग यांनी सांगितले की, याबाबत तक्रार करण्यासाठी मी पत्नीच्या माहेरी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीची बाजू घेत माझ्याशी भांडणं केली. 20 एप्रिल रोजी तिच्या माहेरच्या लोकांनी घरात घुसून आपल्याला बेदम मारहाण केली. माझे वडील कुलदीप सिंह यांनी मध्यस्थी केली तेव्हा त्यांचाही खूप अपमान केला, त्यामुळे त्यांना खूप धक्का बसला आणि तेही घाबरले. त्यानंतर वडील आजारी पडले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मेदांता रुग्णालयात (गुडगाव) उपचारासाठी दाखल केले. मोठ्या प्रतत्नांनी त्यांचा जीव वाचला, असा दावा गुरपिंदरने केला.

ते पुढे म्हणाले की, उपचारात व्यस्त असल्याने मी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवू शकलो नव्हतो. पण त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आणि वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांसह पाच जणांविरुद्ध कलम 420, 452, 323, 504, 427 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत स्थानक प्रमुख आशुतोष रघुवंशी यांनी सांगितले की, फसवणूक आणि इतर आरोपांखाली गुन्हा दाखल असून विचारविनिमय करून पुढील कारवाई केली जाईल.

गुरपिंदरच्या आरोपांवर त्यांच्या पत्नीचे वडील जसपाल यांनी सांगितले की, माझा जावई नशेबाज आणि व्यसनी आहे. लग्नानंतर तो मुलीला मारहाण करायचा. याबाबत पोलिसांत तक्रारही केली होती. गुन्हाही दाखल झाला होता. अनेकवेळा मनोमिलन झालं पण प्रत्येक वेळी पुन्हा त्याच घडामोडी घडायच्या. पण त्यानंतर देखील आम्ही जावई आणि मुलीला परदेशात जाण्यासाठी पैसे दिले. त्यात माझ्या मुलीचा व्हिसा मंजूर झाला आणि जावयाचा नाही. त्यामुळे तो बाहेर जाऊ शकत नव्हता. त्याचे आरोप खोटे आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube