Download App

इस्रोचे Spadex मिशन लाँच, 7 जानेवारीला होणार डॉकिंग, जाणून घ्या सर्वकाही

ISRO PSLV-C60 SpaDeX Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) पुन्हा एकदा जगाला धक्का देण्याची तयारी करत आहे. इस्रोने रात्री 10 वाजता

  • Written By: Last Updated:

ISRO PSLV-C60 SpaDeX Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) पुन्हा एकदा जगाला धक्का देण्याची तयारी करत आहे. इस्रोने रात्री 10 वाजता श्रीहरिकोटा येथून महत्त्वाकांक्षी स्पॅडेक्स मिशन मोहीम प्रक्षेपित केली आहे.  जर इस्रोचे हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास भारत अंतराळातील डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञानाच्या संदर्भात एलिट क्लबमध्ये सामील होईल. इस्रोने या PSLV-C60 मिशनमध्ये स्पेस डॉकिंग प्रयोगासाठी PSLV मधून दोन छोटे उपग्रह प्रक्षेपित केले आहे.

स्पेस स्टेशन आणि चांद्रयान-4 साठी महत्वाचे

माहितीनुसार, इस्रोच्या या मोहिमेचे यश भारतीय अंतराळ स्थानकाचे (BAS) बांधकाम आणि चांद्रयान-4 मोहिमेचे यश ठरवेल. त्यामुळे हे प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. चांद्रयान-4 साठी अंतराळात डॉकिंग हे अतिशय महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. डॉकिंग म्हणजे अंतराळात एकमेकांच्या जवळ आणून दोन भिन्न भाग जोडणे. स्पेस स्टेशनसाठीही हे तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे आहे. अंतराळ स्थानक खूप मोठे आहे. त्यासाठी वेगवेगळे घटक अंतराळात अनेक टप्प्यांत नेले जातात आणि नंतर एकमेकांना जोडले जातात.

या तंत्रज्ञानामुळे भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्यास मदत होणार आहे. चांद्रयान-4 प्रकल्पातही त्याची मदत होईल. स्पॅडेक्स म्हणजे एकाच उपग्रहाचे दोन भाग असतील.

स्पॅडेक्स मिशन म्हणजे काय?

या मोहिमेत एका रॉकेटमधून दोन उपग्रह सोडण्यात आले आहे. एक चेसर करणारा आणि दुसरा टार्गेट. रिझर्व्हमध्ये पोहोचल्यानंतर हे दोन्ही जोडले जातील. या प्रक्रियेला डॉकिंग म्हणतात. हे काम खूपच गुंतागुंतीचे आहे. यापूर्वी केवळ अमेरिका, रशिया आणि चीन हे काम करू शकत होते. असे करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.

… तरीही बायको सोडून गेली तर? वर्क लाईफ बॅलन्सबद्दल उद्योगपती गौतम अदानी स्पष्टच बोलले

तर दुसरीकडे इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा एकच मिशन अनेक टप्प्यांत प्रक्षेपित केले जाते तेव्हा हे तंत्रज्ञान आवश्यक असते. अंतराळ स्थानकासारख्या मोहिमा या तंत्रज्ञानाशिवाय पूर्ण करणे शक्य नाही. हे तंत्रज्ञान फक्त तीन देशांकडे आहे. या मिशनमध्ये इस्रो 24 इतर दुय्यम पेलोड्स देखील अंतराळात पाठवेल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात डॉकिंगची प्रक्रिया पूर्ण होईल. हा प्रयोग पृथ्वीपासून सुमारे 470 किमी अंतरावर होणार आहे.

follow us