ISRO PSLV Module 3 : इस्रोचं रॉकेट अंतराळात कचरा न सोडता पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत दाखल

ISRO PSLV Module 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) ने आणखी एक चांगली कामगिरी केली आहे. इस्त्रोचे रॅकेट PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल 3 (ISRO PSLV Module 3) अंतराळात कोणत्याही प्रकारचा कचरा न सोडता पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत दाखल झालं आहे. याआधी चार दिवसांआधी 21 मार्च 2024 ला या रॉकेटने अशी कामगिरी केली होती. इस्त्रोकडून ट्विटरद्वारे […]

Isro

Isro

ISRO PSLV Module 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) ने आणखी एक चांगली कामगिरी केली आहे. इस्त्रोचे रॅकेट PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल 3 (ISRO PSLV Module 3) अंतराळात कोणत्याही प्रकारचा कचरा न सोडता पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत दाखल झालं आहे. याआधी चार दिवसांआधी 21 मार्च 2024 ला या रॉकेटने अशी कामगिरी केली होती. इस्त्रोकडून ट्विटरद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

इस्त्रोने ट्विट करुन सांगितलं की भारतीय अंतराळ संस्थेने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. 21 मार्च रोजी PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल-3 (POEM-3) ने पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला होता. PSLV-C58/XPoSat मोहिमेने कक्षेत पूर्णपणे प्रवेश केला असल्याचं सांगण्यात आलं आहे. PSLV-C58 मोहीम 1 जानेवारी रोजी पूर्ण झाली. सर्व उपग्रहांना त्यांच्या इच्छित कक्षेतील प्राथमिक अभियान पूर्ण केल्यानंतर, PSLV च्या टर्मिनल स्टेजचे 3-अक्ष स्थिर प्लॅटफॉर्म, POEM-3 मध्ये रूपांतर झालं असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Exit mobile version