ISRO Gaganyaan Mission : चंद्रानंतर अंतराळ करणार काबीज; ‘इस्त्रो’च्या गगनयान मोहिमेची आज पहिली चाचणी
ISRO Gaganyaan Mission : चांद्रयान मोहिम यशस्वी पार पाडल्यानंतर इस्त्रोने सूर्याच्या दिशेने (ISRO Gaganyaan Mission) आदित्य एल 1 यान यशस्वीरित्या पाठवले. त्यानंतर आणखी एका धाडसी मोहिमेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी उड्डाण करणार आहे. ‘क्रू एस्केप सिस्टम’चे प्रात्याक्षिक पहिल्या फ्लाइट टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन 1 द्वारे पाहिले जाईल. या मोहिमेचा अर्थ असा की आता इस्त्रो मानवरहित मोहिमा आणि इतर चाचण्या करण्यास सक्षम असेल.
Namo Bharat : देशाला मिळाली पहिली ‘नमो भारत’ रॅपिड ट्रेन; काय आहेत याची वैशिष्ट्ये?
या मोहिमेत तीन सदस्यांची टीम तीन दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीच्या 400 किलोमीटर वरच्या कक्षेत पाठवलं जाणार आहे. हे क्रू मॉडेल समुद्रात सुरक्षितपणे उतरवण्यात येईल. जर या मोहिमेत भारत यशस्वी झाला तर असे करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. त्यामुळे आजचा दिवस भारतासाठी महत्वाचाच असणार आहे. इस्त्रोने या मोहिमेची सर्व तयारी पूर्ण केली आहे.
आज या मोहिमेची पहिली चाचणी होणार आहे. या मोहिमेची प्रत्यक्षात सुरुवात 2025 मध्ये होणार आहे. हे लक्षात घेऊन एक वर्ष आधीच याची तयारी केली जात आहे. अंतरळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठविण्यासाठी भारत एलव्हीएम3 रॉकेटचा वापर करणार आहे. हे एक रॉकेट आहे यामध्ये घन, द्रव आणि क्रायोजेनिक टप्प्यांचा समावेश आहे.
#WATCH | Visuals from Satish Dhawan Space Centre in Sriharikota, Andhra Pradesh as Indian Space Research Organisation (ISRO) will conduct Gaganyaan’s First Flight Test Vehicle Abort Mission-1 (TV-D1).#Gaganyaan pic.twitter.com/rEMqTr9sJt
— ANI (@ANI) October 21, 2023
चांद्रयान मोहिम यशस्वी
दरम्यान, भारताचे चांद्रयान 3 मिशन 23 ऑगस्ट रोजी यशस्वी ठरले होते. या दिवशी चांद्रयानाने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. भारताची ही कामगिरी यशस्वी राहिली. पहिलाच देश म्हणून जगभरात नावलौकिक मिळाला. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी स्वतः पीएम मोदी बंगळुरूत आले होते. येथे त्यांनी इस्त्रोतील शास्त्रज्ञांशी संवाद साधला. त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. सॉफ्ट लँडिंग ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणाला शिवशक्ती पाँइंट असे नाव दिले. चर याआधी चांद्रयान 2 मिशन जेथे क्रॅश झाले होते त्या ठिकाणाला तिरंगा पॉइंट असे नाव दिले.
Chandrayaan 3 : PM मोदींच्या ‘त्या’ घोषणेवर शिक्कामोर्तब! महत्वाचा निर्णय आला कागदावर