Chandrayaan 3 : PM मोदींच्या ‘त्या’ घोषणेवर शिक्कामोर्तब! महत्वाचा निर्णय आला कागदावर
Chandrayaan 3 : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेने (Chandrayaan 3) मोठे यश मिळवत थेट चंद्रावर पाऊल ठेवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला. भारताच्या या यशाचं जगभरात मोठं कौतुक झालं. इस्त्रोच्या (ISRO) या कामगिरीचा गौरव 23 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी ‘नॅशनल स्पेस डे’ म्हणून (National Space Day) साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करत या घोषणेवर शिक्कमोर्तब केले. यानंतर आता दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस देशभरात नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
भारताचे चांद्रयान 3 मिशन 23 ऑगस्ट रोजी यशस्वी ठरले होते. या दिवशी चांद्रयानाने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. भारताची ही कामगिरी यशस्वी राहिली. पहिलाच देश म्हणून जगभरात नावलौकिक मिळाला. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी स्वतः पीएम मोदी बंगळुरूत आले होते. येथे त्यांनी इस्त्रोतील शास्त्रज्ञांशी संवाद साधला. त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. सॉफ्ट लँडिंग ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणाला शिवशक्ती पाँइंट असे नाव दिले. चर याआधी चांद्रयान 2 मिशन जेथे क्रॅश झाले होते त्या ठिकाणाला तिरंगा पॉइंट असे नाव दिले.
यानंतर मोदींनी इस्त्रोच्या कामगिरीचे कौतुक म्हणून 23 ऑगस्ट हा दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करत नॅशनल स्पेस डे 23 ऑगस्ट रोजी दरवर्षी साजरा करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
Chandrayaan : ’23 ऑगस्ट’ राष्ट्रीय अंतराळ दिवस; PM मोदींनी केली मोठी घोषणा
.. अन् मोदींनाही अश्रू झाले अनावर
मी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होतो. पण, माझं मन वैज्ञानिकांजवळ होतं. इथं येण्यासाठी मी उत्सुक होतो. मी सकाळीच आल्यामुळे तुम्हाला येथे सकाळी यावं लागलं. किती ओव्हरटाईम करावा लागला. पण सकाळी जाऊन तुम्हाला नमन करावं अशी माझी इच्छा होती. येथे येताच तुमचं दर्शन घेण्याची इच्छा होती. तुम्हा सर्वांना सॅल्यूट करायचा होता. सॅल्यूट हा तुमच्या कष्टासाठी, सॅल्यूट तुमच्य धैर्यासाठी, सॅल्यूट तुमच्या सातत्याला, सॅल्यूट तुमच्या महत्वाकांक्षेला, असं म्हणत असताना मोदींनाही अश्रू अनावर होत होते.