Rajasthan Assembly Elections 2023 : प्रचारादरम्यान खाण्यापिण्याच्या खर्चावर राहणार बारीक लक्ष! निवडणुकीतील खर्चाची दर यादी जाहीर

Rajasthan Assembly Elections 2023 : प्रचारादरम्यान खाण्यापिण्याच्या खर्चावर राहणार बारीक लक्ष! निवडणुकीतील खर्चाची दर यादी जाहीर

Rajasthan Assembly elections 2023 : राजस्थानसह (Rajasthan)विविध पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्या-त्या राज्यातील राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्व ताकद लावली आहे. निवडणूक आयोगाचेही (Election Commission)या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेऊन आहे. निवडणूक आयोगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांबद्दल (political party)अनेक मोठे निर्णय घेत आहेत. यावेळी निवडणूक आयोगाने उमेदवारांना करावयाच्या खर्चाची दर यादी तयार केली आहे. या यादीमध्ये चहा, कॉफी, समोसा, रसगुल्ला, आईस्क्रीम यासह प्रत्येक पदार्थाचे दर निवडणूक प्रचारावेळी निश्चित केले आहेत. हा खर्च उमेदवाराच्या खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे चहापानावर खर्च करतानाही जरासा जपूनच करावा लागणार आहे.

रेल्वे पोलिसांची धडाकेबाज कारवाई! उपराजधानीत 9 किलो सोनं जप्त; दोघं पोलिसांच्या जाळ्यात…

आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर निवडणूक आयोगाची (Election Commission) बारीक नजर आहे. निवडणूक आयोगाने प्रचार साहित्य आणि सभेत वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची किंमतही निश्चित केली आहे. निवडणूक आयोग त्याच्या दर यादीनुसार उमेदवाराच्या खर्चाची तपासणी करेल. खरं तर निवडणुकीच्यावेळी उमेदवार लाखो, करोडो रुपये खर्च करतात. पण आता खर्चावर लगाम येणार आहे. कारण उमेदवारांच्या प्रत्येक खर्चावर निवडणूक आयोगाकडून लक्ष ठेवणार आहे.

World Cup 2023 : हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानची दाणादाण, 191 धावांवर ऑलआउट

प्रत्येक जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रत्येक उमेदवाराच्या खर्चावर लक्ष ठेवलं जाणार आहे. आयोगाने निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची दर यादीही तयार केली आहे. या दर यादीनुसार निवडणूक सभा आणि कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे भाडेही निश्चित केले आहेत. प्लॅस्टिक खुर्ची 5 रुपये, पाईप खुर्ची 3 रुपये, व्हीआयपी खुर्ची 105 रुपये, लाकडी टेबल 53 रुपये, ट्यूबलाइट 10 रुपये, हॅलोजन 500 वॅट 42 रुपये, 1000 वॅट 74 रुपये, व्हीआयपी सोफा सेट 630 रुपये प्रतिदिन जोडला जाणार आहे.

याशिवाय, उमेदवार 5 सीटर कारसाठी दररोज 2625 रुपये किंवा 3675 रुपये भाड्याने खर्च करु शकतो. 20 सीटरच्या मिनी बससाठी 6300 रुपये, 35 सीटर बससाठी 8400 रुपये आहे. टेम्पो 1260 रुपये, व्हॅन 5250 रुपये, चालकाचे वेतन 630 रुपये प्रतिदिन उमेदवाराच्या खर्चात जोडले जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) दर यादीत चहा 5 रुपये, कॉफी 13 रुपये, समोसा 12 रुपये आणि रसगुल्ला 210 रुपये किलो दराने खरेदी करता येणार आहे. याशिवाय इतर सर्व गोष्टींचे दरही निश्चित करण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या प्रचारात खर्च केलेल्या रकमेचा तपशील निवडणूक आयोगाला देणं बंधनकारक आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक खर्चाचा तपशील न देणाऱ्या उमेदवारांवर निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई केली आहे. नुकतेच निवडणूक आयोगाने राजस्थानमधील 46 नेत्यांना अपात्र ठरवून निवडणूक लढविण्यास बंदी देखील घातली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube