V Narayanan Said National Satellites Working Continuously : मागील काही दिवसांपासून भारताने दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केलं आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्त्रोचा (ISRO) ‘मास्टर’ प्लान समोर आलाय. ज्यामुळे पाकिस्तानला घाम फुटला आहे. इंफाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना इस्त्रोच्या अध्यक्षांनी (ISRO Chairman V Narayanan) ही माहिती दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय, ते सविस्तर जाणून घेऊ या.
इंफाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ रविवारी पार पडला. यावेळी इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन उपस्थित होते. यावेळी संबोधित करताना व्ही नारायण यांनी म्हटलंय की, देशातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी धोरणात्मक उद्देशाने किमान 10 उपग्रह अहोरात्र कार्यरत आहेत. तुम्हाला सगळ्यांना आपल्या शेजाऱ्यांबद्दल माहिती आहे. जर आपल्याला आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करायची असेल तर आपल्याला आपल्या उपग्रहांद्वारे सेवा (security Of Country) द्यावी लागेल, असं देखील त्यांनी म्हटलंय.
Imphal, Manipur: ISRO Chairman V Narayanan said, “At least 10 satellites are continuously working round-the-clock for the strategic purpose to ensure the safety and security of the citizens of the country.”
He further said, “…You all know about our neighbours. If we have to… pic.twitter.com/yakGzqt04s
— ANI (@ANI) May 12, 2025
आपल्याला आपल्या 7,000 किमी समुद्रकिनाऱ्यावरील भागांचे निरीक्षण करावे लागेल. आपल्याला संपूर्ण उत्तर भागाचे सतत निरीक्षण करावे लागेल. उपग्रह (National Satellites) आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय आपण ते साध्य करू शकत नाही. देशाच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी धोरणात्मक हेतूंसाठी 10 उपग्रह अहोरात्र कार्यरत आहेत. उपग्रहांच्या माध्यमातून इस्रो कृषी, टेलि-एज्युकेशन, टेलि-मेडिसिन, टेलिव्हिजन प्रसारण, हवामान अंदाज, पर्यावरण, अन्न क्षेत्र आणि सुरक्षा आणि धोरणात्मक क्षेत्रात लोकांना सेवा देत आहे, असे इस्रोचे अध्यक्ष केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात म्हणाले.
युद्धबंदीनंतर शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 2,200 अंकांनी वधारला, तर निफ्टीही सुस्साट…
आपत्ती व्यवस्थापनात उपग्रह प्रभावीपणे काम करत आहेत. पूर्वी आपत्तींमध्ये हजारो लोक जीव गमवायचे, पण आता तसे राहिलेले नाही. चांद्रयान-1 मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या रेणूंचे पुरावे शोधले. ही कामगिरी करणारा भारत हा पहिला देश असल्याचं देखील व्ही नारायण यांनी म्हटलंय.
भारताने अनेक महत्त्वाचे उपग्रह बनवले
भारतातून 34 देशांसाठी 433 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आणि कक्षेत ठेवण्यात आले. हवामान बदल आणि इतर क्षेत्रांवर लक्ष ठेवण्यासाठी भारताने G-20 देशांसाठी उपग्रह बनवले आहेत.
भारत आणि अमेरिका संयुक्तपणे जगातील सर्वात प्रगत पृथ्वी-इमेजिंग उपग्रह तयार करणार आहेत, तो भारतातूनच प्रक्षेपित केला जाणार असल्याची माहिती मिळतेय.