VIDEO : ‘झेंडावंदन करु दिलं, म्हणजे पालकमंत्री पद मिळालं असं नाही’…मंत्री भरत गोगावलेंचा निशाणा कोणावर?

Bharat Gogavale Targets Aditi Tatkare Raigad Guardian Minister : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा (Raigad Guardian Minister) अजूनही कायम आहे. विधानसभा निवडणुकात होवून सहा महिने उलटले, तरी अजून या जागेचा तिढा सुटलेला नाही. तर मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavale) हे देखील रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. पालकमंत्र्यांसाठी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट हे दिवस अत्यंत महत्वाचे असतात. यावर भरत गोगावले यांनी म्हटलंय की, झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्री पद (Aditi Tatkare) मिळालं, अशातला भाग नाही.
1 मे रोजी रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्याहस्त झेंडावंदन करण्यात आलं होतं. यावरून आता पु्न्हा रायगडच्या पालकमंत्रिपदाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरून आता मंत्री भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांना टोला लगावला आहे. झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळालं, असं होत नसल्याचं गोगावलेंनी म्हटलंय.
तालिबान सरकारचा अजब फतवा!; अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी…
पालकमंत्रिपदासाठी रायगडमधून कुणाला संधी मिळणार, याची राज्यभर चर्चा आहे. यामध्ये अदिती तटकरे आणि भरत गोगावले ही नावे सर्वात पुढे आहेत. विशेष म्हणजे या दोघांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली. त्यामुळे रायगड जिल्ह्याला दोन कॅबिनेट लाभले आहेत. परंतु अजून पालकमंत्रीपदावर शिक्कामोर्तब मात्र झालेलं नाही. रायगडचे पालकमंत्रिपद हा शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेससाठी कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात कुणाला संधी मिळणार, याकडे संपू्र्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
रायगड पालकमंत्रिपदावरून भरत गोगावलेंचा मंत्री आदिती तटकरेंवर निशाणा#BharatGogavale #AditiTatkare #Raigad #GuardianMinister pic.twitter.com/5OO6fLS7q3
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 12, 2025
परंतु, आताची वेळ ती नाही. देशात जी काही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे, त्यावर सध्या आमचं लक्ष केंद्रित आहे. त्या अनुषंगाने पुढची वाटचाल करत आहोत, असं माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय. काल आम्हाला आदेश आले होते की, युद्ध थांबतंय. आम्ही तिरंगा फडकवून बाईक रॅली काढणार होतो. परंतु, परत रात्री उशिरा फोन आले की, त्यांची काही मानसिकता दिसत नाही. त्यामुळे आम्ही थांबलो, म्हणूनच आम्ही रत्नागिरीमध्ये आहोत, असं देखील गोगावले यांनी स्पष्ट केलंय.
Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकरचा मनमोहक अंदाज, चाहते फिदा…
खारलॅंडच्या जमिनी पाण्याखाली जातात आणि नापिक होतात. त्यांच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करण्याचं काम चालू आहे. गेल्या वेळी तेराशे हेक्टरमध्ये लागवड केली होती, यावेळी 1900 हेक्टर पर्यंत जाण्याचे उद्दिष्ट आहे. आंबा नुकसानी संदर्भात पर्यायी मार्ग काढण्याबाबतीत आमचे संशोधन चालू आहे. कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बूट, मंडप डेकोरेशन साहित्य व फर्निचर साठवण्यात आले होते, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.