Download App

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सोडला कॉंग्रेसचा हात, कर्नाटकात भाजपकडून मोठा धक्का

  • Written By: Last Updated:

Jagdish Shettar : गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपचा (BJP) त्याग करून कॉंग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) हे स्वगृही परतणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर आज त्यांनी काँग्रे (Congress) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

‘Musafiraa’ ची सफर घडवणारे तिसरे गाणे रिलीज; ‘झिलमिल’ मधून झळकले मैत्री अन् प्रेम 

येत्या काही दिवसांत देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. अशातच काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं कॉंग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. एकीकडे हे चित्र असतांनाच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत शेट्टर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी शेट्टर यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री व्हीएस येडियुरप्पा, कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्रही हजर होते. शेट्टर स्वगृही परतल्याने कर्नाटकात काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.

‘आमचा सेनापती इमानदार, हरण्याची भीती नाही’; जरांगेंशी बंद दाराआड चर्चेनंतरही आंदोलकांना विश्वास 

शेट्टर भाजपमधून बाहेर का पडले?
एप्रिल 2023 मध्ये कर्नाटक विधानसभेपूर्वी शेट्टर यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपने तिकीट न दिल्याने ते नाराज झाले होते. त्यामुळं त्यांनी भारतीय जनता पक्षाला राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती.
हुबळी धारवाड मध्य मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर ही निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचे महेश तेंगीनाकाई यांनी शेट्टर यांचा ३४,२८९ मतांनी पराभव केला होता. शेट्टर यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी तरी उत्तर कर्नाटकात त्यांची चांगली पकड आहे. लिंगायत समाजातील बड्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.

कोण आहेत जगदीश शेट्टर?
माजी मुख्यमंत्री शेट्टर यांचा जन्म कर्नाटकातील केरूर येथे झाला. 1980 च्या दशकात त्यांनी जनता पक्षातून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर 1994 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.ते हुबळी-धारवाड भागातून सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांचे वडीलही कर्नाटकच्या राजकारणातील मोठे व्यक्तिमत्त्व होते. शेट्टर यांचे वडील शिवप्पा शेट्टर हुबळीचे महापौर होते.

follow us