‘आमचा सेनापती इमानदार, हरण्याची भीती नाही’; जरांगेंशी बंद दाराआड चर्चेनंतरही आंदोलकांना विश्वास

‘आमचा सेनापती इमानदार, हरण्याची भीती नाही’; जरांगेंशी बंद दाराआड चर्चेनंतरही आंदोलकांना विश्वास

Maratha Reservation : आमचा सेनापती इमानदार आहे, त्यामुळे सैन्याला हरण्याची भीत नसल्याचा विश्वास मराठा आरक्षणासाठी निघालेल्या पदयात्रेतील आंदोलकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पदयात्रा पुण्याहून मुंबईकडे रवाना होत आहे. एकीकडे मुंबईत या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आलीयं, तर दुसरीकडे सरकारच्या शिष्टमंडळाने बंद दाराआड मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केलीयं. या चर्चेनंतरही आंदोलकांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल दृढ विश्वास व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.

कोंडी फुटली! जागावाटपाच्या चर्चेसाठी महाविकास आघाडीचं ‘वंचित’ला निमंत्रण, पत्रच धाडलं

आंदोलक म्हणाले, सेनापती इमानदार असतो तेव्हा सैन्याला हरण्याची भीती नसते. सरकारने कितीही बंद दाराआड चर्चा केली तरीही आमचा जरांगेंवर पूर्ण विश्वास आहे
आम्हाला जे दुख: पीडा आहे ते मांडण्यासाठी समाज रस्त्यावर उतरला असून आम्ही दोन महिन्यांच्या तयारीने रस्त्यावर उतरलो आहोत, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. तसेच दुसऱ्या आंदोलकाने सरकारवर शिष्टमंडळ पाठवण्यावरुन संताप व्यक्त केला आहे. शिष्टमंडळ पाठवण्याचं खूपवेळा झालंय. जबाबदार व्यक्तीने येऊन जबाबदारी स्विकारावी. वेळ मागणं, आश्वासने देणं अनेकदा झालंयं अंतरवली सराटीपासून ते आत्तापर्यंत शांततेत पदयात्रा आलीयं, इथून पुढच्या प्रवासाची दखल सरकारने घ्यावी, आम्हाला फक्त टिकणारं ओबीसीतून आरक्षण द्यावं, या शब्दांत आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे.

‘इंडिया’मधील पक्षांत ऐक्याचा अभाव, या आघाडीला काहीही भवितव्य नाही; प्रशांत किशोरांची बोचरी टीका

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची पदयात्रा पुण्याहून मुंबईकडे कूच करीत आहे. काही तासांनतर जरांगेंची पदयात्रा मुंबईत दाखल होणार असून दुसरीकडे सरकारकडून त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाकडूनही जरांगे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. तरीही मनोज जरांगे यांनी आंदोलकांना जबाबदाऱ्या वाटून देत मुंबईकडे जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ममतांच्या खेळीने काँग्रेस प्रेशरमध्ये? नितीश-अखिलेश अन् केजरीवालांचाही फायदा

दरम्यान, मनोज जरांगे यांची पदयात्रा मुंबईत पोहोचू नये यासाठी सरकारकडून अनेक शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मनोज जरांगेंनी आंदोलन स्थगित करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ, छत्रपती संभाजीनगरचे आयुक्तांनीदेखील जरांगे यांची मनधरणी केली आहे. मात्र सरकारचे हे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. या संपूर्ण घडामोडींवरुनही आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुमख्यमंत्र्यांपैकी कोणीही यावं आणि यावर तोडगा काढावा, आम्हालाही मुंबईला जायची हौस नाहीये, सरकारने मागण्या मान्य कराव्यात आम्ही माघारी फिरु, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube