मोठी बातमी : गँगस्टर अतिक अहमदच्या मुलाचं एन्काउंटर; यूपी STF ची मोठी कारवाई

Asad Ahmed News : उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतिक अहमदच्या मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम या दोघांना यूपी एसटीएफने एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. या दोघांवरही पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. झाशी येथे झालेल्या चकमक या दोघांचा खात्मा करण्यात आला आला आहे. पोलिसांची या दोघांजवळून विदेशी शस्त्रे जप्त केल्याचा दावा केला […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (62)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (62)

Asad Ahmed News : उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतिक अहमदच्या मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम या दोघांना यूपी एसटीएफने एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. या दोघांवरही पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. झाशी येथे झालेल्या चकमक या दोघांचा खात्मा करण्यात आला आला आहे. पोलिसांची या दोघांजवळून विदेशी शस्त्रे जप्त केल्याचा दावा केला आहे. अतिक अहमद मुलगा असद आणि गुलामचा मुलगा मकसूदन हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल खून प्रकरणात वॉन्टेड होते. या दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

 

कारवाईदरम्यान STF ने अतिक अहमद आणि त्याच्या साथीदाराला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते, परंतु असद आणि गुलाम यांनी एसटीएफच्या पथकावर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला पथकाकडूनही दोख प्रत्युत्तर देण्यात आले. यात दोघांचा मृत्यू झाला. ठार झालेल्या दोघांवरही प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. उमेश पाल यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यापासून असद आणि गुलाम फरार होते.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ

उमेश पाल खून प्रकरणातील फरार असद अहमद आणि शूटर गुलाम यांच्या एन्काऊंटरवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या कारवाईनंतर योगींनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. सीएम योगींनी यूपी एसटीएफचे कौतुक केले आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे नेते सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, पोलीस आणि एसटीएफ त्यांचे काम करत आहेत. कायद्याच्या आधारे ठोस कारवाई करू, असे सांगत ही कारवाईही संविधानाच्या अंतर्गत असल्याचे ते म्हणाले.

Exit mobile version