Download App

Jallianwala Bagh Massacre काय आहे इतिहास? जाणून घ्या…

Jallianwala Bagh Massacre : भारताच्या पारतंत्र्यांच्या अनेक रक्तरंजित घटनांमुळे इतिहासात आपल्याला वाचायला मिळतात. अशीच एक गटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. या घटनेबद्दल सांगायलं गेलं तर अंगावर काटा येतो. इंग्रजांचे अनन्वित अत्याचार आणि भारतीयांचा नरसंहार म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. या घटनेला आज 104 वर्ष झाले. काय आहे हा नरसंहार आणि याचा इतिहास जाणून घेऊ…

पंजाबमधील अमृतसरमध्ये जालियनवाला बाग या ठिकाणी हा नरसंहार झाला होता. 13 एप्रिल 1919 हा तो इतिहासातिल काळा दिवस होता ज्या दिवशी ही भयावह घटना घडली. अनेक महिला, मुल आणि कुटूंबची कुटूंबच यामध्ये मारली गेली. इतिहासातील अनेक घटनांमध्ये ही घटना एकाचवेळी मोठा नरसंहार करणारी असल्याने हा दिवस शहिद दिन आणि जालियनवाला बाग हत्याकांड दिन म्हणून स्मृतीदिन आहे.

ज्या दिवशी हे हत्याकांड झालं त्यादिवशी जालियनवाला बागमध्ये इंग्रजांच्या अत्याचार आणि अन्यायाविरोधात तसेच रोलेट कायदा, सत्यपाल आणि सैफुद्दीनच्या अटकेचा निषेध म्हणून एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शहरात कर्फ्यू लावण्यात आला होता. मात्र हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या सभेला उपस्थिती लावली होती. तर काही लोक यामध्ये पंजाबी लोकांचा सण असणारा बैसाखीच्या निमित्ताने जत्रेत फिरायला आले होते.

जेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांना या सभेबद्दल समजलं तेव्हा त्यांनी ही सभा धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला. यातून 1857 ची क्रांती पुन्हा घडू नये म्हणून भारतीयांना आणि या सभेला चिरडून टाकले. सभेत नेते भाषण देत असताना ब्रिगेडिअर जनरल रेजीनॉल्ड डायर यांनी 90 सैनिकांसह जालियनवाला बागला घेरलं लोकांना सुचना देण्याआधीच बेछुट गोळीबार करण्यात आला. यामध्ये तब्बल 5000 लोक एकाच वेळी मारले गेले.

ज्ञानाच्या महासागरास अभिवादन! तब्बल 18 हजार पुस्तकातून साकारली मोझेक प्रतिकृती

यावेळी ब्रिटिश सैनिकांनी 10 मिनिटांमध्ये तब्बल 1650 राउंड गोळ्या चालवल्या. लोकांना जालियनवाला बागेतून बाहेर पडताच आले नाही. बागेतून बाहेर पडायला एकच रस्ता होता. लोकांनी जीव वाचवण्यासाठी विहीरीत उड्या मारल्या. काही वेळानंतर ती विहिरही प्रतांनी भरली. आजही या हत्याकांडांतील मृतांचा आकडा माहीत नाही पण डेप्यूटी कमिश्न कार्यालयात 484 लोकांच्या मृत्यूची नोंद आहे. तर जालियनवाला बागमध्ये 388 शहिदांची नोंद आहे. तर ब्रिटीश सरकारकडे 379 लोकांचा मृत्यू आणि 200 लोक जखमी झाल्याचा दावा करण्यात आला होता. तर लोकांकडून या हत्याकांडात 1000 लोक मारले गेल्याचं सांगण्यात आलं होत. तर 2000 हुन अधिक लोक जखमी झाले होते.

Tags

follow us