मोठी बातमी! कुलगाम चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलांची कामगिरी

सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.

Indian Military

Indian Military

Jammu Kashmir Encounter : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना (Jammu Kashmir) शोधून काढून त्यांचा खात्मा करण्याचं ऑपरेशन सुरुच आहे. त्यामुळे या भागात सातत्याने चकमकी झडत (Kulgam Encounter) आहेत. कुलगाम जिल्ह्यातही अशाच एका चकमकीत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं. सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या चकमकीत दोन जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दक्षिण काश्मीरातील कुलगाम आणि शोपियां जिल्ह्यांच्या सीमा भागाच्या नजीक बिहीबाग-कद्दरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना घेराबंदी करून शोध मोहीम राबवण्यात येत होती. या दरम्यान चार ते पाच दहशतवादी येथे असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. या चकमकीत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश मिलालं. मात्र या चकमकीत दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये यावर्षात अनेकदा आतंकवादी घटना घडल्या आहेत. २० ऑक्टोबर रोजी मध्य काश्मीर भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात लोकांचा मृत्यू झाला होता. याआधी काश्मीरात रोजगाराच्या निमित्ताने काम करणाऱ्या परप्रांतीय नागरिकांवर अतिरेक्यांनी हल्ले केले होते. २०१९ या एकाच वर्षात १४२ दहशतवादी मारले गेले आहेत. या वर्षात मात्र आतापर्यंत फक्त ४५ दहशतवाद्यांना मारण्यात यश मिळालं आहे. २०१९ मध्ये ५० नागरिकांचाही बळी गेला होता.

Jammu and Kashmir : मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला

लोकसभा निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दर महिन्याला दहशतवादी कोणत्या ना कोणत्या छोट्या-मोठ्या घटना घडवत आहेत. ऑक्टोबरमध्येच दहशतवाद्यांनी खोऱ्यातील बोगद्याच्या बांधकामात गुंतलेल्या कंपनीच्या कामगारांच्या तळावर हल्ला केला होता. ज्यामध्ये 6 स्थलांतरित कामगारांसह 7 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर दहशतवाद्यांनी आणखी एका परप्रांतीय मजुरावर हल्ला केला.

Exit mobile version