Download App

किश्तवाडचा बदला बारामूलात, सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; तीन अतिरेक्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या बारामूलात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांत चकमक उडाली. या चकमकीत सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं.

Jammu Kashmir News : जम्मू काश्मीरच्या बारामूलात (Baramulla) सुरक्षा दल आणि अतिरेक्यांत चकमक उडाली. या चकमकीत सुरक्षा दलाला (Security Forces) मोठं यश मिळालं. भारतीय सेना आणि (Indian Army) जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत (Jammu Kashmir) तीन अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. या वृत्ताला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. या भागात अजूनही ऑपरेशन सुरुच आहे. याआधी किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत दोन भारतीय जवान शहीद झाले होते. मात्र त्यानंतर सुरक्षा दलांनी बारामूलात तीन अतिरेक्यांना मारून एक प्रकारे बदलाच घेतला आहे.

मोठी बातमी! काश्मीरच्या किश्तवाडमधील चकमकीत दोन जवान शहीद; दोन जखमी

गुप्तचर यंत्रणांकडून इनपुट्स मिळाले होते. या भागात आणखी काही अतिरेकी लपून बसले आहेत. यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. रात्रभर चकमक सुरू होती. बारामूलात दोन ते तीन अतिरेकी लपून बसले होते. या अतिरेक्यांना मारण्यात आले. पुंछ, राजौरी, डोडा, कठुआ, रियासी आणि उधमपूर या पहाडी जिल्ह्यांत मागील दोन महिन्यांपासून दहशतवादी हल्ले होत आहेत. अतिरेकी दबा धरून बसतात आणि अचानक हल्ला करतात. नंतर येथील जंगलात पळून जातात. या भागात 40 ते 50 अतिरेकी असावेत असा अंदाज आहे. यानंतर भारतीय सैन्याने चार हजारांहून अधिक प्रशिक्षित जवान येथे तैनात केले आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीची (Jammu Kashmir Elections) घोषणा झाली आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. निवडणुका शांतीपूर्ण वातावरणात व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि भारतीय सैन्याकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. अतिरेकी मात्र वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडील काळात दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाली आहे. ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.

काश्मिरच्या इलेक्शमध्ये इंजिनिअर राशिदची एन्ट्री! लोकसभेची पुनरावत्ती होणार?

किश्तवाडमध्ये दोन जवान शहीद

याआधी जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक (Kishtwar Encounter) झाली होती. गुप्त माहिती मिळाल्यानंतर किश्तवाडमधील चटरू भागात जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीने संयुक्त अभियान सुरू करण्यात आले. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चकमकीला सुरुवात झाली. याआधी नायदगाम गावात लपून बसलेल्या अतिरेकी आणि सुरक्षा दलात गोळीबार झाल्याचे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. या चकमकीत चार जवान जखमी झाले होते. या जवानांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र यातील दोन जवानांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

follow us