Download App

मोठी बातमी! कुपवाडात चकमक, तीन जवान जखमी; एक अतिरेक्याचा खात्मा

कुपावाडामध्ये (Indian Army) पु्न्हा एकदा दहशतवादी आणि भारतीय जवानांत जोरदार धुमश्चक्री उडाली.

Kupwara Encounter : मागील काही दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या (Kupwara Encounter) घटना वाढल्या आहेत. या हल्ल्यांना भारतीय सेनेच्या जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. आता आणखी एकदा दहशतवादी आणि जवानांत चकमकीची (Jammu Kashmir) बातमी आली आहे. जम्मू काश्मीरमधील कुपावाडामध्ये (Indian Army) पु्न्हा एकदा दहशतवादी आणि भारतीय जवानांत जोरदार धुमश्चक्री उडाली. चकमक अजूनही सुरू असून दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार केला जात आहे. या चकमकीत तीन जवान जखमी झाल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी या भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. या चकमकीत पाकिस्तानी सैन्याच्या बॉर्डर अॅक्शन टीममध्ये सहभागी असलेला एक अतिरेकी मारला गेला आहे.

Jammu Kashmir मध्ये सैन्याची मोठी कारवाई; 5 दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

मागील काही दिवसांपासून काश्मीरमधील कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यांत चकमकी होत आहेत. एलओसीवरून होणाऱ्या घुसखोरीचे प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडले आहेत. तीन दिवसांत कुपवाडात ही दुसरी घटना आहे. आतंकवाद विरोधी अभियान सुरू असताना कुपवाडातील कुमकरी भागातील मच्छल सेक्टरमध्ये ही घटना घडली. या भागात भारतीय सैन्याकडून खास अभियान राबवण्यात येत आहे.

अभियान पूर्ण झाल्यानंतरच या चकमकीमागचं खरं कारण समोर येणार आहे. अतिरेक्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता की पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमची ही कारवाई आहे का याचंही उत्तर यातून मिळणार आहे. भारतीय जवानांवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. जवळपास तीन तास दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू होता.

या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. या जवानांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात एक अतिरेकी देखील मारला गेल्याची माहिती मिळाली आहे. या अतिरेक्याचा मृतदेह एलओसीवर पाकिस्तानी सेनेच्या फायरिंग रेंजमध्ये पडला आहे. या हल्ल्याला विफल करण्याचे काम भारतीय जवानांनी करून दाखवले आहे. याआधी मंगळवारी कुपवाडात चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला होता. तसेच एक अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आले होते.

लष्कराच्या कॅम्पवर जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; जवानांकडून चोख प्रत्युत्तर

अतिरेक्यांना शोधण्यासाठी विशेष अभियान 

दरम्यान, जम्मू काश्मीर राज्यातील डोंगराळ भागातील जिल्ह्यांत जवळपास 40 ते 50 अतिरेकी लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर सुरक्षा दलांनी लपलेल्या अतिरेक्यांना शोधून काढण्यासाठी मोठे अभियान सुरू केले. या अभियानात अतिरेक्यांकडून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. भारतीय जवानांवर भ्याड हल्ले केले जात आहेत. भारतीय जवानांकडूनही अतिरेक्यांना तिखट प्रत्युत्तर दिले जात आहे.

 

follow us