Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) कठुआ जिल्ह्यातील बिल्लावर परिसरात दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या (Indian Army) वाहनावर हल्ला केल्याची घटना घडलीयं. दहशतवाद्यांनी एका टेकडीवरुन लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. सोबतच ग्रेनेडही फेकल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आलीय. दरम्यान, या हल्ल्यात आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
Indian Army convoy attacked by terrorists in Machedi area of Kathua district in Jammu and Kashmir. The area falls under the 9 Corps of the Indian Army. After firing by terrorists, our troops also retaliated. More details awaited: Defence officials pic.twitter.com/1Vpklp8UGk
— ANI (@ANI) July 8, 2024
मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यांचे सत्र सुरुच आहेत. नुकताच जम्मू-काश्मीरमधील राजौरी भागातही लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाला. मंजकोटच्या ग्लुटी गावात लष्कराच्या छावणीवर कर्तव्यावर असलेल्या जवानावर अचानकपणे गोळीबार करण्यात आला. यावेळी सुरक्षेत असलेला जवान शहीद झाला.
राहुल गांधींबद्दल शरद पवारांचं मत काय?, लेट्सअप मराठीच्या महामुलाखतीत केला ‘हा’ मोठा दावा
राजौरीनंतर आता कुठआमध्येही लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आलायं. विशेष म्हणजे या हल्ल्यात दहशतवाद्यांनी गोळीबारासह ग्रेनेड हल्लाही केलायं. हल्ला होताच भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहिम सुरु करण्यात आलीयं. डोडा जिल्ह्यातही 11 आणि 12 जून रोजी हल्ला झाल्याने जम्मू काश्मीरात एकच खळबळ उडाली होती. 11 जूनला चत्तरगल्ला इथल्या चेक पोस्टवरच दहशतवाद्यांनी हल्ला करत सुरक्षा जवानांना जखमी केलं. तर गंडोहमध्ये 12 जून रोजी कोटामध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला.