Download App

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी गुलाल उधळला; पहिल्या उमेदवाराचा दणदणीत विजय

  • Written By: Last Updated:

Prashant Kishor wins MLC Election :  राजकीय रणनितीकार अशी ओळख असलेले नेते म्हणजे प्रशांते किशोर होय. प्रशांत किशोर यांनी काही महिन्यांपूर्वीच आपल्या जनसुराज्य पक्ष स्थापन केला आहे. तसेच सध्या त्यांची बिहारमध्ये जनसुराज्य यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून बिहारमधील जनसामान्यांपर्यंत पक्ष पोहोचवण्यासाठी प्रशांत किशोर प्रयत्न करताना दिसत आहेत. नुकतंच बिहारमध्ये विधान परिषदेच्या जागांचे मतदान झाले आहे. या निवडणुकीत प्रशांत  किशोर यांच्या पक्षाने विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यामुळे सक्रीय राजकारणात त्यांची एंट्री झाल्याचे बोलले जात आहे.

बिहारमध्ये नुकत्याच पाच जागांसाठी विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. यातील दोन जागा भाजपने तर दोन जागा या जेडीयुने जिंकल्या आहेत. तर एका जागेवर जनसुराज्य पक्षाने पाठिंबा दिलेला उमेदवार विजयी झाला आहे. अफाक अहमद यांना प्रशांत किशोर यांनी पाठिंबा दिला होता. त्यांनी त्यांनी सीपीआचे उमेदवार पुष्कर आनंद यांचा पराभव केला आहे. पुष्कर आनंद हे केदारनाथ पांडे यांचे सुपुत्र आहेत. या जागेवर आधी केदारनाथ पांडेंचा विजय झाला होता. ते बिहार माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष होते.

टीव्ही – रेडिओ पाठोपाठ आता ॲलेक्सा सांगणार मोदींची ‘मन की बात’

या विजयामुळे प्रशांत किशोर यांची सक्रीय राजकारणात एंट्री झाल्याचे बोलले जात आहे. किशोर हे राजकीय रणनितीकार म्हणून सगळ्यांना परिचीत आहेत. पण आता त्यांनी सक्रीय राजकारणात एंट्री घेतली आहे. सध्या त्यांची बिहारमध्ये जनसुराज्य यात्रा सुरु असून या यात्रेमध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधताना दिसत आहेत.

खात्यात पैसे नाही तरी UPI द्वारे पेमेंट होणार…जाणून घ्या कसे काय

दरम्यान, भाजपने या निवडणुकीत अधिकची एक जिंकली आहे. याआधी एकुण 5 विधानपरिषदेच्या जागांपैकी 4 जागा जागा जेडीयूकडे होते. आता भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत तर जेडीयूने 2 जागी विजय संपादन केला आहे.

Tags

follow us