Download App

तुम्ही हिंदूंना का शिवीगाळ करता? जावेद अख्तर पाक लष्करप्रमुखांवर संतापले…

गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीरवर ( Asim Munir) टीका केली आहे.

Javed Akhtar On Asim Munir : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor रावबले. त्यानंतर भारत-पाकिस्तानातील तणाव आणखी वाढला. यादरम्यान पाकिस्तानकडून अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध बॉलिवूड लेखक आणि गीतकार जावेद अख्त (Javed Akhtar) यांनी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीरवर ( Asim Munir) टीका केली.

140 कोटींचा घोटाळा: मेधा कुलकर्णी भाजपच्याच नेत्याविरोधात आक्रमक का ? तिकीट कापल्याची सल की अजूनही काही 

कपिल सिब्बल यांच्यासोबत दिलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी असीम मुनीर यांनी केलेल्या विधानांवर भाष्य करत त्यांना ‘असंवेदनशील’ म्हटले. ते म्हणाले, कोणताही देशसंध नसतो. कोणत्याही देशातील सर्व नागरिक एकसारखे असू शकत नाहीत. जर एखाद्या देशाचे सरकार वाईट असेल तर त्याचा पहिला परिणाम तेथील नागरिकांवरच होता. आपला संघर्ष केवळ सरकार, सैन्य आणि दहशतवाद्यांशीच असला पाहिजे, निष्पाप लोकांविषयी सहानुभूती असली पाहिजे.

देशात अनेक भागांत पावासाचं थैमान, ‘या’ ७ राज्यांना रेड अलर्ट, महाराष्ट्राबाबतही मोठी बातमी 

पुढं ते म्हणाले की, मी युट्यूबवर पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे भाषण पाहिले. तो खूप असंवेदनशील व्यक्ती वाटतो. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही वाईट आहोत, तर भारतीयांना शिव्या द्या. पण तुम्ही हिंदूंना का शिव्या देत आहात? त्यांना हे कळत नाही का की, पाकिस्तानातही हिंदूंची लोकसंख्या आहे? तुम्ही तुमच्या स्वत:च्या लोकांचा आदर करू नये का? तुम्ही कोणत्या प्रकारची माणसं आहात? तु्म्ही काय म्हणत आहात? याची तुम्हाला जराही समज नाही, अशी टीका अख्तर यांनी केली.

पाकच्या एका क्षेपणास्त्राचे नाव अब्दाली आहे. अब्दालीने मुस्लिमांवर हल्ला केला होता. मग तो तुमचा हिरो कसा? तुमच्या भूमीवर जन्मलेल्या लोकांचे काय? तुम्ही हल्लेखोराचे स्वागत करत आहात? तुम्हाला इतिहासाची काही समज आहे का? ज्या समुदायांना तुम्ही स्वतःचे म्हणवता त्यांनाच यांच्याशी काहीही संबंध ठेवायचे नाहीत. अनेक अरब देशांनी पाकिस्तानींसाठी व्हिसा बंदी घातली, असं अख्तर म्हणाले.

असीम मुनीर हिंदूंबद्दल काय म्हणाले?

हिंदू आणि मुस्लिमांमध्ये बरेच फरक आहेत. आणि पाकिस्तानी मुस्लिम प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहेत. आपल्या पूर्वजांना वाटायचे की आपण जीवनाच्या प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत; आपला धर्म वेगळा आहे, आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत, आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे आपल्या भावी पिढ्यांनी पाकिस्तानची कहाणी विसरू नये, असे पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर म्हणाले होते.

follow us