Download App

लालूंचा मोदींना टोमणा! ‘2024 च्या पराभवानंतर मोदी विदेशात पिझ्झा-चाऊनमिनचा..,’

Lalu Prasad Yadav Vs Pm Narendra Modi : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरातून आता विरोधी पक्ष एकवटले आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेतेही आता मैदानात उतरले आहेत. अशातच राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल चढविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यावर बोट ठेवत त्यांनी टोमणा मारला आहे. बिहार सरकारमधील मंत्री देज प्रताप यादव यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. (JDU Leader Lalu Prasad Yadav Critisize Pm Narendra Modi)

Mumbai Train Firing : जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार, एका पोलीस अधिकाऱ्यांसह 4 प्रवाशांचा मृत्यू

आगामी लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवाची चिंता वाटत असल्यानेच मोदी विदेशात जागा शोधत आहेत. विदेशात मोदी आरामासाठी आणि पिझ्झा, मोमोज, चाऊमेनचा आस्वाद घेणार आहेत, त्यासाठी ते जागा शोधत आहेत. आगामी निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी बाहेर जाण्याच्या विचारात आहेत म्हणूनच ते विदेश दौरा करीत असल्याचा टोला लालू प्रसाद यादव यांनी लगावला आहे. यावेळी बोलताना यादव यांनी मणिपूर हिंसाचारासह इतर मुद्द्यांवरही भाष्य केलं आहे.

Manipur Violence : मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; महिला अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्याची मागणी

पुढे बोलताना ते म्हणाले, पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या भारताच्या बैठकीची मी वाट पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही हा प्रयत्न हाणून पाडू. आम्ही एकजुटीने भाजपचा पराभव केला पाहिजे, असा आरोपही त्यांनी केला. मुंबईत होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह लालू प्रसाद यादवही उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, एकंदरीत देशात सध्या विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. एकीकडे सत्ताधारी तर दुसरीकडे विरोधकांकडून टीका-टिपण्ण्या सुरु आहेत.

Tags

follow us