Jharkhand Government : विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान सरकारकडून 44 भरती परीक्षा रद्द

Jharkhand Government : गेल्या काही दिवसांपासून झारखंड राज्यात विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असल्याने आता झारखंड सरकारने मोठा

Jharkhand Government

Jharkhand Government

Jharkhand Government : गेल्या काही दिवसांपासून झारखंड राज्यात विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असल्याने आता झारखंड सरकारने मोठा निर्णय घेत तब्बल एकाच वेळी 44 भरती परीक्षा रद्द केल्याची माहिती दिली आहे. कथित अनियमिततांमुळे या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत असं सरकारकडून सांगण्यात आले आहे. याबाबत सरकारकडून एकूण आठ स्वतंत्र अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. यात 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि आउटसोर्सिंग एजन्सी TDPL (TSR Data Processing Pvt Ltd) द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांचा समावेश आहे.

रद्द करण्यात आलेल्या परीक्षा

(JPSC द्वारे आयोजित आणि TDPL एजन्सीमार्फत राबविण्यात आलेल्या परीक्षा)

झारखंडमधील विद्यापीठांमध्ये शिक्षकेतर पदांसाठी भरती (जाहिरात क्र. 09/2025)

सहाय्यक संचालक / वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅकलॉग) पदांसाठी भरती (जाहिरात क्र. 10/2025)

सहाय्यक संचालक / वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (नियमित) पदांसाठी भरती (जाहिरात क्र. 11/2025)

औषध निरीक्षक (Drug Inspector) पदासाठी भरती (जाहिरात क्र. 12/2025)

सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती (बॅकलॉग) (जाहिरात क्र. 02/2026)

सरकारी पॉलिटेक्निक / महिला पॉलिटेक्निकमध्ये अधिव्याख्याता (Lecturer) पदासाठी भरती (बॅकलॉग) (जाहिरात क्र. 03/2026)

सरकारी पॉलिटेक्निक / महिला पॉलिटेक्निकमध्ये अधिव्याख्याता (Lecturer) पदासाठी भरती (नियमित) (जाहिरात क्र. 04/2026)

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक (सुपर स्पेशालिस्ट) पदासाठी भरती (जाहिरात क्र. 07/2026)

दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) पदासाठी भरती (जाहिरात क्र. 22/2023)

सहाय्यक वनसंरक्षक पदासाठी भरती (जाहिरात क्र. 03/2024)

वन क्षेत्रपाल (Forest Range Officer) पदासाठी भरती (जाहिरात क्र. 04/2024)

सहाय्यक सरकारी वकील (Assistant Public Prosecutor) पदासाठी भरती (बॅकलॉग) (जाहिरात क्र. 05/2025)

सहाय्यक सरकारी वकील (Assistant Public Prosecutor) पदासाठी भरती (नियमित) (जाहिरात क्र. 06/2025)

झारखंड संयुक्त नागरी सेवा परीक्षा-2025 (जाहिरात क्र. 01/2026)

झारखंड संयुक्त नागरी सेवा परीक्षा (बॅकलॉग)-2025 (जाहिरात क्रमांक 05/2026)

झारखंड संयुक्त नागरी सेवा परीक्षा (बॅकलॉग)-2023 (जाहिरात क्रमांक 06/2026)

अन्न सुरक्षा अधिकारी भरती (जाहिरात क्रमांक 18/2023)

बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) भरती (जाहिरात क्रमांक 21/2023)

संयुक्त नागरी सेवा परीक्षा-2023 (जाहिरात क्रमांक 01/2024)

रद्द करण्यात आलेल्या परीक्षा

(TDPL/इतर वादग्रस्त संस्थांचा सहभाग असल्यामुळे रद्द)

6 वी मर्यादित उप-जिल्हाधिकारी भरती (जाहिरात क्रमांक 11/2018)

झारखंड पात्रता परीक्षा (JET) 2024 (जाहिरात क्रमांक 08/2025)

JSSC सामान्य पदवी-स्तर संयुक्त स्पर्धा परीक्षा (CGL) (जाहिरात क्रमांक 10/2023)

पुढे ढकलण्यात आलेल्या/स्थगित परीक्षा

(अधिसूचना 5405) : अन्न विश्लेषक (05/2024), उप-संचालक (अभियोजन) (03/2025), प्रकल्प व्यवस्थापक (04/2025), कारखाना निरीक्षक

(01/2025), बॉयलर निरीक्षक (02/2025) आणि संचालक (07/2025) या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या नाहीत, तर पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि संबंधित संस्थेची चौकशी CID कडे सोपवण्यात आली आहे.

धनलाभ होणार, आज ‘या’ राशींना फायदा; जाणून घ्या सर्व काही-

CID चौकशीच्या कक्षेत असलेल्या जुन्या परीक्षा

(अधिसूचना 5406): 17 जुन्या परीक्षा जसे की 5 वी नागरी सेवा परीक्षा, 2016 नागरी सेवा परीक्षा, 2021 नागरी सेवा परीक्षा, सहाय्यक अभियंता, दिवाणी न्यायाधीश (Civil Judge) इत्यादी CID चौकशीच्या कक्षेत आणण्यात आल्या आहेत.

Exit mobile version