रांची : झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे (Jharkhand Mukti Morcha) मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) राजीनाम्याच्या तयारीत आहे. ईडीकडून त्यांना जमीन घोटाळ्याच्या आरोपत सातवे आणि अखरचे समन्स पाठविण्यात आले होते. मात्र या समन्सलाही ते चौकशीसाठी उपस्थित न राहिल्याने ईडीकडून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. (Jharkhand Mukti Morcha Chief and Chief Minister Hemant Soren is preparing to resign.)
हेमंत सोरेन यांच्यावर मागील काही दिवसांपासून जमीन घोटाळ्याचे आरोप आहेत. सध्या अटकेत असलेल्या बडगई झोनचे उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांच्या घरावर छापा टाकल्यानंर ईडीला जमिनीची अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. त्यानंतर ईडीने या प्रकरणात ECIR (RNZO25/2023) नोंदवला होता, याच प्रकरणात सध्या ईडी चौकशी केली जात आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीने सोरेन यांना यापूर्वी सहावेळा समन्स पाठविले होते. मात्र सोरेन यांनी केराची टोपली दाखविली होती. ईडी पक्षपात करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
नुकतेच 29 डिसेंबर रोजी ईडीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सातवे आणि अखेरचे समन्स पाठवून त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. सोरेन यांनी दोन दिवसांत योग्य ठिकाण आणि तारीख याबाबत लेखी माहिती द्यावी, असे ईडीने म्हंटले होते. पण या मुदतीत त्यांनी ईडीच्या पत्राला उत्तर दिले नाही. त्यामुळे आता ईडी त्यांच्या चौकशीसाठी आणखी कठोर पर्याय वापरणार असल्याचे बोलले जात आहे. चौकशीदरम्यान, त्यांना अटक होण्याचीही शक्यता आहे. यासाठी त्यांनी राजीनाम्याची तयारी केली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन मुख्यमंत्रीपदी येण्याची चिन्हे आहेत.
Hit and Run : नव्या कायद्यात नेमकं काय? कठोर तरतुदींचा उल्लेख करत असीम सरोदेंनी केंद्राला सुनावलं
नवीन मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी उद्या (3 जानेवारी) झारखंड मुक्ती मोर्चाची विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आघाडीतील पक्ष म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाचेही आमदार उपस्थित राहणार आहेत.