Download App

Jio Financial Services बीएसईवर 265 रूपयांना लिस्ट पण तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

Jio Financial Services Listing : आज आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आज रिलायन्सच्या जीओ फायनान्सिअल सर्व्हिसेस ( Jio Financial Services Listing ) शेअर बाजात लिस्ट झाला आहे. मुकेश अंबानींच्या या कंपनीचा शेअर एनएसईवर ( NSE ) 262 रूपयांना तर बीएसईवर ( BSE ) 265 रूपायांना लिस्ट झाला आहे. मात्र या शेअर खरेदी-विक्री संदर्भात शेअर मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकदारांना एक सल्ला दिला आहे.

समृध्दी महामार्गावर फोटो किंवा रील्स काढाल तर तुरुंगात जाल, महामार्ग पोलिसांचा इशारा

काय म्हणाले अनिल सिंघवी?
रिलायन्सच्या जीओ फायनान्सिअल सर्व्हिसेस शेअर बाजात लिस्ट झाला आहे. यावर शेअर मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकदारांना एक सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, जे लोक दिर्घकालीन गुंतवणूक करतात त्यांनी हा शेअर ठेवावा. तर जे लोक अल्पकालीन गुंतवणूक करतात त्यांनी हा शेअरवर 250 रूपयांचा स्टॉपलॉस ठेवावा.

मोठी बातमी! तलाठी परीक्षांपूर्वीचं सर्व्हर डाऊन; प्रशासनावर वेळ बदलण्याची नामुष्की

ते पुढे म्हणाले की, या कंपनीची नेटवर्थ 1.17 लाख कोटी रूपये आहे. तर यामध्ये रिलायन्सची 6.1 टक्के भागीदारी आहे. ज्याची व्हॅल्यू 1.05 लाख कोटी रूपये आहे. तर बूक व्हॅल्यू 185 रूपये आहे. त्यामुळे कंपनीकडे भरपूर भांडवलं आहे. तर मोठ्या प्रमाणात ती व्यावसायात उतरण्याची शक्यता आहे. मात्र नकारत्मक गोष्ट ही आहे की, अद्याप या कंपनीने आपला व्यवसाय खास सुरू केलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर या शेअर खरेदी-विक्री संदर्भात शेअर मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकदारांना हा सल्ला दिला आहे.

जीओ फायनान्सिअल सर्व्हिसेस लिस्टींगनंतर काय?
रिलायन्सच्या जीओ फायनान्सिअल सर्व्हिसेस ( Jio Financial Services Listing ) शेअर बाजात लिस्ट झाला आहे. त्यानंतर आता तो 10 दिवसांपर्यंत ट्रेंड टू ट्रेंडमध्ये राहिल. तर 3 दिवसांत सर्व इंडेक्समधून बाहेर होणार आहे. तर 2 दिवस सर्किट लागले तर 3 दिवस एग्झिट आणखी वाढेल. असं सांगण्यात येत आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज