मोठी बातमी! तलाठी परीक्षांपूर्वीचं सर्व्हर डाऊन; प्रशासनावर वेळ बदलण्याची नामुष्की
मुंबई : तलाठी पदासाठी आज राज्य भरातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणाऱ्या होत्या. परंतु, राज्यातील विविध केंद्रांवरील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे आता प्रशासनाला परीक्षेची वेळ बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. पहिले ही परीक्षा दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत होणार होती. मात्र सर्व्हर डाऊन झाल्यामुळे आता याच्या वेळेत बदल करण्यात आला असून , आता ही परीक्षा 2 ते 4 या वेळेत होणार होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तलाठी भरतीच्या नावखाली राज्यात बेरोजगार तरुणांची शासन फसवणूक करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. (Talathi Exam Timing Change Due to Server Down)
भाजपच्या बालेकिल्ल्यात जाऊन राऊत थेट भिडणार; ईशान्य मुंबईतून खासदारकी मिळवणार
राज्यभरातील तलाठी भरती परीक्षेंच्या केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सावळ्या गोंधळामुळे एखाद्या विद्यार्थ्यासोबत काही बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असे वडेट्टीावर यांनी म्हटले आहे. भरतीच्या नावाखालील हजार-हजार रुपये जमा केले जात असून, हे पैसे कोणाच्या खात्यात जातात? असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
विद्यार्थांकडून तीव्र शब्दांत नाराजी
तलाठी परीक्षांपूर्वी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासकीय व्यवस्था विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत गंभीर नाही का? असा सवालही परीक्षार्थी विद्यार्थांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
बडा नेता अजितदादांच्या गळाला? माजी मुख्यमंत्र्यांनी घेतली प्रफुल्ल पटेलांची भेट
काय म्हणाले वडेट्टीवर?
तलाठी परीक्षांपूर्वी विविध केंद्रांवरील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, आज तलाठी च्या परिक्षेसाठी सर्वर डाऊन झाल्यामुळे लाखो विद्यार्थी परिक्षाकेंद्राबाहेर उभे आहेत. एकीकडे हजार रुपये परिक्षा शुल्क घ्यायचे आणि परिक्षेसाठी फक्त चारच केंद्रे उभारायची यामुळे विद्यार्थांना प्रचंड पायपीट करावी लागत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये परिक्षा केंद्र उभारली असती तर असा गोंधळ झाला नसता असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तसेच आजची परिक्षा जर रद्द झाली तर, विद्यार्थ्यांच्या राहण्याचा जाण्यायेण्याचा खर्च सरकारने करावा अशी मागणीदेखील वडेट्टीवार यांनी केली आहे.