Download App

Job Scam : देशातील दिग्गज IT कंपनी TCS मध्ये 100 कोटींचा घोटाळा; चार अधिकारी निलंबित

  • Written By: Last Updated:

Job Scam In TCS : देशात दिवसेंदिवस बेरोजगार तरूणांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना, देशातील दिग्गज आयटी कंपनी TCS मधून मोठा नोकरी घोटाळा समोर आला आहे. आतापर्यंत तुम्ही तुमच्या सरकारी नोकरीच्या बदल्यात लाच घेतल्याबद्दल ऐकले असेल. मात्र आता खासगी नोकरीसाठी हा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. याबाबत TV9 आणि लाइव्ह मिंटने वृत्त प्रकाशित केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा घोटाळा थोडा थोडका नसून तब्बल 100 कोटींचा आहे.

पिंग-पोंग बॉल, फुगे अन् बर्फाचा वापर करुनही ‘टायटॅनिक’ अद्यापही समुद्रातच, वैज्ञानिक ठरले फेल…

प्रकाशित वृत्तानुसार, देशातील सर्वात मोठी टेक कंपनी TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये करोडोंचा नोकरी घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याप्रकरणी ४ अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे. सर्वात मोठी टेक कंपनी म्हणून ओळख असणाऱ्या TCS मध्ये नोकरीच्या बदल्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचे सांगितले जात आहे. संबंधित कंपनीने पैसे घेऊन अनेकांची भरती केल्याचा आरोप टीसीएसवर करण्यात आला आहे.

पुढची विठ्ठलाची महापूजा अजितदादा करतील; अजित पवारांच्या ‘त्या’ विधानानंतर मिटकरींचं सूचक वक्तव्य, चर्चांना उधाण

तीन वर्षात 3 लाख नोकऱ्या
गेल्या तीन वर्षांत TCS ने कंत्राटदारांसह 3 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. त्यानंतर आता हे घोटाळ्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. TCS मध्ये 6 लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून, कंपनीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कन्सल्टन्सी फर्मकडून नोकरीच्या बदल्यात लाच घेतल्याचे तपासात आढळून आले आहे. हा घोटाळा छोटा
नसून तब्बल 100 कोटींचा आहे.

लाइव्ह मिंटच्या बातमीनुसार, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी नोकरी घोटाळ्यात सामील असून, या सर्व घटनेसाठी कंपनीच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित अधिकाऱ्यांवर कन्सल्टन्सी स्टाफिंग फर्मकडून भरघोस कमिशन घेतल्याचा आरोप करण्यात आहे.

Missing Submarine : ‘फादर्स डे’ ची भेट बापलेकांना पडली महागात; टायटॅनिक पाहायला जायचं नव्हतं पण…

कसा झाला एवढा मोठा घोटाळा?
टीसीएसमधील हा नोकरी घोटाळा एका व्हिसलब्लोअरने उघड केला आहे. या व्यक्तीने टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि चीफ ऑपरेशन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला आहे. कंपनीचे RMG ग्लोबल हेड ईएस चक्रवर्ती यांनी अनेकांना कामावर घेण्याच्या बदल्यात कन्सल्टन्सी स्टाफिंग फर्मकडून पैसे घेतल्याचा आरोप व्हिसलब्लोअरने केला आहे.

Tags

follow us