JP Nadda on Dhiraj Sahu: काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू (Dhiraj Sahu) यांच्या घर आणि कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने झारखंड आणि ओडिशातील साहू यांच्य़ाशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकून ही मालमत्ता जप्त केली. आतापर्यंत आयटीने 300 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. यावरून आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी ट्विटरवरून काँग्रेसवर निशाणा साधला. बंधू उत्तर तर द्यावेच लागले, तुम्हाला ही (धीरज साहू) आणि तुमचे नेते राहुल गांधीनाही, अशी पोस्ट करून पैसे कुणाचे? असा सवालही नड्डा यांनी केला.
भुजबळ पिऊन बोलतात काय? मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा खोचक टोला
जेपी नड्डा यांनी आपल्या ट्वीटरवर एक पोस्ट लिहीली. त्यात त्यांनी राहुल गांधींनाही घेरलं नड्डा यांनी लिहिलं की, हा नवा भारत आहे. येथे राजघराण्याच्या नावावर देशातील सामान्य जनतेचे कोणतेही शोषण करू दिले जाणार नाही. आता कॉंग्रेसवाले पळून पळून थकून जातील, पण कायदा तुमची पाठ सोडणार नाही. कॉंग्रेस हा जर भ्रष्टाचाराची गॅंरटी असेल तर पंतप्रधान नरेद्र मोदी हे भ्रष्टाचारावर कारवाईची गॅरंटी आहेत. जनतेकडून लुटलेला एक पै-पै परत करावी लागले, असं नड्डा म्हणाले.
‘ओबीसी-मराठा बांधवांनी एकमेकांच्या अंगावर..,’; किल्लारीच्या सभेत जरांगेंनी दिली मोठी जबाबदारी
तर भाजपचे नवे आमदार बालमुकुंद आचार्य यांनी रस्त्यावर उतरून काँग्रेस पक्ष आणि धीरज साहू यांच्याविरोधात निदर्शने केली. सर्वांचा हिशोब घेणार असल्याचं ते म्हणाले. काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपचे आमदार बालमुकुंद आचार्य म्हणाले, कपांटात 310 कोटींहून अधिक रक्कम सापडली आहे, दोषींना शिक्षा होईल. संपूर्ण देशात काँग्रेसचे सरकार आहे, त्यांनी लूट केली आहे, आम्ही सर्वांचा हिशोब घेऊ, असं ते म्हणाले.
दरम्यान, खासदार धीरज साहू यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर काँग्रेसने हात झटकले. यावर काँग्रेसचे सचिव आणि खासदार जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा खासदार धीरज साहू यांच्या व्यवसायाशी काहीही संबंध नाही. या मालमत्तेबद्दल फक्त साहूच सांगू शकतात. तसेच, साहू यांनी त्यांच्या घरी आणि कार्यालयात सापडलेल्या रोख रकमेबाबत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व काही सांगावे, असं रमेश म्हणाले.
दरम्यान, या कारवाईमुळं कॉंग्रेसची चांगलीच अडचण झाली असून यावर आता राहुल गांधी काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.