Justice B.R. Gavai : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई (Justice B.R. Gavai) यांची नियुक्ती केली आहे. 14 मे 2025 पासून न्यायमूर्ती गवई सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहे. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना (Sanjeev Khanna) यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. आज कायदा मंत्रालयाने भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती गवई यांची नियुक्ती जाहीर करणारी अधिसूचना जारी केली आहे.
बी.आर. गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 अमरावती (Amravati) येथे झाला आहे. न्यायमूर्ती गवई यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल. न्यायमूर्ती गवई यांचा कार्यकाळ 23 डिसेंबर रोजी वयाच्या 65 व्या वर्षी संपणार आहे. बी.आर. गवई देशाचे दुसरे दलित सरन्यायधीश असणार आहे. देशाचे पहिले दलित सरन्यायाधीश न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन होते.
[BREAKING] President Droupadi Murmu clears appointment of Justice BR Gavai as the next Chief Justice of India with effect from May 14, 2025. pic.twitter.com/5gtthHn1Rp
— Bar and Bench (@barandbench) April 29, 2025
कोण आहे न्यायमूर्ती बी. आर. गवई
भारताचे 52 वे सरन्यायाधीश होणारे न्यायमूर्ती बी.आर.गवई यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला असून त्यांनी 6 मार्च 1985 रोजी वकील म्हणून नोंदणी केली. कारकिर्दीच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी स्वतंत्रपणे प्रॅक्टिस सुरू केली आणि त्यानंतर त्यांनी नागपूर खंडपीठात प्रामुख्याने घटनात्मक आणि प्रशासकीय कायद्याच्या क्षेत्रात त्यांनी आपली वकिली सुरू ठेवली आणि नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठात सल्लागार म्हणूनही काम केले.
साखर कारखाना घोटाळा…मंत्री राधाकृष्ण विखेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
तर 14 नोव्हेंबर 2003 रोजी बी.आर. गवई यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 12 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांची कायमस्वरूपी न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली. त्यांनी उच्च न्यायालयातील त्यांच्या कार्यकाळात मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि पनाजी खंडपीठांमध्ये न्यायालयीन कामकाजात भाग घेतला. त्यांची नियुक्ती 24 मे 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती.