फडणवीसांनी उद्धाटन केलेल्या अमरावती एअरपोर्टबाबत जयंत पाटलांची मोठी मागणी, म्हणाले…

फडणवीसांनी उद्धाटन केलेल्या अमरावती एअरपोर्टबाबत जयंत पाटलांची मोठी मागणी, म्हणाले…

Jayant Patil Demenad for change name of Amravati Airport into Dr. Punjabrao Deshmukh : आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती एअरपोर्टचे उद्घाटन संपन्न झाले. त्यानंतर अमरावती विमानतळाला डॉ पंजाबराव देशमुख यांचे नाव अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केली. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया देत त्यांनी ही मागणी केली आहे.

जयंतराव पाटील आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले की, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती एअरपोर्टचे उद्घाटन संपन्न झाले. बरेच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अमरावतीकरांना स्वतःच्या हक्काचे बंद पडलेले विमानतळ पुन्हा उपलब्ध झाले आहे. विदर्भाच्या मातीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे अशी आमची मागणी आहे.

… तर दलित सरसंघचालक करुन दाखवावा, निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा ओपन चॅलेंज

पुरंदर एअरपोर्ट शिवाय पुण्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळणार नाही; फडणवीसांनी दिलं अश्वासन

पिंपरी चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम झाला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या दिवशी विजय शिवतारे निवडून आले. त्याच दिवशी मी सांगितलं की, पुरंदर एअरपोर्ट होणार तो आता थांबत नाही. पुरंदर एअरपोर्ट पुण्याच्या विकासाला चार पटींनी पुढे नेणार आहे. कारण पुणे एअरफोर्सची महत्त्वाची सदन कमांड आहे. येथील एअरपोर्टवर देशाच्या सुरक्षेसाठी वर्षभर एअरफोर्सची अॅक्टीव्हिटी चालवली जाते. त्यामुळे मोठा काळ आपल्याला एअरस्पेस आणि धावपट्टी बंद करून एअरफोर्सला हे एअरपोर्ट द्यावचं लागत. त्यामुळे दुसरं एअरपोर्ट होत नाही तो पर्यंत पुण्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळू शकत नाही. तर आता पुरंदर एअरपोर्टसाठी भूमि अधिग्रहनचा प्रस्ताव सरकारकडे आलेला आहे. त्यासाठी परवाच बैठक झाली. त्याला आता लवकरच परवानगी देऊ. असं म्हणत फडणवीसांनी या अधिग्रहनात कोणावरच अन्याय होणार नाही. असं देखील ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube