काँग्रेसला झटका, राहुल गांधी आणि त्यांच्या भारत जोडो यात्रेला.. भाजप नेत्याने केला मोठा खुलासा..

Congress : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली तर काँग्रेसला मात्र जोरदार झटका बसला आहे. यानंतर काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका होत आहे. आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा : भारतात लोकशाही धोक्यात; […]

Gandhi

Gandhi

Congress : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली तर काँग्रेसला मात्र जोरदार झटका बसला आहे. यानंतर काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका होत आहे. आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे.

वाचा : भारतात लोकशाही धोक्यात; राहुल गांधींच्या वक्तव्यावर अभिनेता म्हणाला, खोटारडा आणि निर्बुद्ध माणूस

सिंधिया मध्य प्रदेश (Madhya Pradesh) दौऱ्यावर होते. यावेळी येथे एका कार्यक्रमात ते म्हणाले, की राहुल गांधी यांना देशातील जनतेने नाकारले आहे. मी त्यांच्या लूकवर काही बोलणार नाही. तीन राज्यातील निवडणूक निकालांवरून हे दिसून येते की देशातील राजकारणात त्यांची आता काय स्थिती राहिली आहे. निवडणूक निकालांवरुन स्पष्ट होत आहे की राहुल गांधी आणि त्यांच्या भारत जोडो यात्रेला कुणीही गंभीरतेने घेतले नाही.

मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब आहे. कदाचित निवडणुकांपर्यंत राज्यात काँग्रेस शिल्लकही राहणार नाही, असा चिमटाही सिंधिया यांनी काढला.

Anurag Thakur : पेगॅसस फोनमध्ये नाही, राहुल गांधी यांच्या डोक्यात, भाजपकडून राहुल गांधीवर खरमरीत टीका

तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रेचाही काही परिणाम झाल्याचे दिसले नाही. त्रिपुरा राज्यात सत्ताधारी भाजपच्याही काही जागा कमी झाल्या आहेत. मात्र, भाजपला येथे बहुमत मिळाले आहे. मात्र, त्रिपुरासह अन्य राज्यातील निवडणुकांचे निकाल पाहिले तर काँग्रेस कुठेच दिसत नाही. काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा निश्चितच आहे.

https://www.youtube.com/watch?v=gV0gOWpzPyo

Exit mobile version